शहरे आणि गावे

जालना जिल्हा

Category:

 

आधी औरंगाबाद जिल्ह्याचा भाग असणारा जालना जिल्हा १ मे १९८२ रोजी वेगळा केला गेला. समर्थ रामदास स्वामींचे जन्मस्थान असल्यामुळे या जिल्हयाला धार्मिक पावनस्पर्श लाभला आहे. याचबरोबर जालन्याजवळील उपग्रह अनुश्रवण भूकेंद्रामुळे (सॅटेलाईट मॉनिटरिंग अर्थ स्टेशन ) आधुनिक भारतात या जिल्ह्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

जालना जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

जालना हा कृषिप्रधान जिल्हा असून, दोन्ही हंगामात घेतले जाणारे ज्वारी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे अन्नधान्य पीक असून कापूस हे प्रमुख नगदी पीक आहे. करडई उत्पादनाच्या दृष्टीने हा जिल्हा महत्त्वपूर्ण ठरतो.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

जालना जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

समर्थ रामदास स्वामी – श्री समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म जालना जिल्ह्यातील जांब या गावी झाला. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीचा पाया भक्कम करण्याचे काम समर्थांमुळे सोपे झाले आणि या महाराष्ट्राच्या भुवनी आनंदवन उदयास आले.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

जालना जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

धाडसी लमाणी लोकांचे वास्तव्य हे जालना जिल्ह्याचे वेगळे वैशिष्ट्ये आहे. भिल्ल्ल जमातीचे लोकही जिल्ह्यात आढळतात. भिल्ल जमातीची भाषा भिल्ली असून, अहिराणी व पावरी या बोलीभाषाही या भागात बोलल्या जातात.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

जालना जिल्ह्याबद्दल भौगोलिक माहिती

Category:

 

जालना जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या मध्य भागात स्थित असून मराठवाडा विभागात येतो. आधी औरंगाबाद जिल्ह्याचा भाग असणारा जालना जिल्हा १ मे १९८२ रोजी वेगळा केला गेला. जालना जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७६१२ चौ.कि.मी आहे तर लोकसंख्या १६,१२,३५७ इतकी आहे.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

जालना जिल्ह्यातील पर्यटनस्थळे:

Category:

 

राजूर येथील श्री गणेश मंदिर – अनेक श्रध्दास्थाने असणार्‍या मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील राजूरचा गणपती हेही असंख्य भक्तांचे श्रध्दास्थान आहे. जालना जिल्हयातील राजूर हे गणपतीचे पूर्ण पीठ मानले जाते. महाराष्ट्रात मोरगांव, चिंचवड व राजूर ही श्रीगणेशाची तीन पूर्ण पिठे तर पद्मालय हे अर्ध पीठ मानले जाते.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

जालना जिल्ह्यातील दळणवळण सोयी

Category:

 

जालना जिल्ह्याचे गेल्या काही वर्षात झपाट्याने औद्योगिकीकरण झाले आहे. मनमाड-काचीगुडा हा रुंदमापी लोहमार्ग जिल्ह्यातून जातो.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

जालना जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

जिल्ह्यात जालना, परतूर,अंबड, भोकरदन, जाफराबाद व जालना येथे औद्योगिक वसाहती असून,जालना शहर हे जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. जालना जिल्ह्यात ४ साखर कारखाने आहेत.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

जालना जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श जालना शहरास झाल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. मराठवाड्याच्या इतिहासाशीच जिल्ह्याचा इतिहास निगडीत आहे. हा मुलुख निजामाकडून मराठ्यांनी जिंकून घेतला व त्यानंतर १८०३ मधील जाफराबाद तालुक्यातील असईच्या युद्धात मराठ्यांना हा जिल्हा इंग्रजांच्या ताब्यात द्यावा लागला.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

जळगाव जिल्हा

Category:

 

पूर्वी खानदेश या नावाने संबोधला जाणारा जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे. चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून जळगावचे नाव अग्रस्थानी येते. केळी व तेलबियांसाठी आघाडीवर असलेला हा जिल्हा उद्योगव्यवसाय आणि शिक्षणक्षेत्र या क्षेत्रांमध्येही भरघोस कामगिरी बजावत आहे.

  June 23, 2015