शहरे आणि गावे

रत्नागिरी जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

समुद्र किनारी असणारा रत्नदुर्ग अथवा भगवती किल्ला बहामनी काळापासून अस्तित्वात आहे. आजच्या खुद्द रत्नागिरी शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत पण त्याही जास्तीत जास्त दोन-अडीचशे वर्षांच्याच असतील.रत्नागिरी शहराची वसाहत प्रामुख्याने ब्रिटिश कालखंडात म्हणजे १८२२ नंतर वसलेली आहे. किल्ले रत्नागिरी, पेठ, शिवापूर, मौजे झाडगाव आणि मौजे रहाटघर ही चार ठिकाणे एकत्रित करून ब्रिटिशांनी त्यास रत्नागिरी भागाचा दर्जा दिला व नंतर ते जिल्ह्याचे ठिकाण बनले.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

रायगड जिल्हा

Category:

 

रायगड या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानीचा किल्ला रायगड हे या जिल्हयाचे प्रमुख वैशिष्ट्य.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

रायगड जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

Category:

 

भात’ हे रायगड जिल्ह्याचे मुख्य पीक असून लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी जवळजवळ ७०% क्षेत्रात हे पीक घेतले जाते. भात उत्पादनात संपूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. माणगाव, अलिबाग, पेण, पनवेल या तालुक्यात भाताचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

रायगड जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

Category:

 

तानाजी मालुसरे – छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंह असे ज्यांना म्हटले जायचे त्या तानाजी मालुसरे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उमरठ या गावी झाला.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

रायगड जिल्ह्यातील लोकजीवन

Category:

 

रायगड जिल्ह्यात आगरी, समाज तसेच कातकरी, ठाकर, वारली या आदिवासी जमातींचे लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. जिल्ह्याला भरपूर लांबीचा सागर किनारा लाभला असल्याने मासेमारी करणार्‍या कोळी जमातींची वस्तीही देखील मोठ्या प्रमाणावर आहे.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

रायगड जिल्ह्याची भौगोलिक माहिती

Category:

 

रायगड जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ७१४८ कि.मी.² इतके आहे. तर या जिल्ह्याची लोकसंख्या २००१ च्या जनगणनेनुसार २२,०७,९२९ एवढी आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिमेकडे अरबी समुद्र असून पूर्व दिशेला सह्याद्रीची पर्वतरांग आहे.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

Category:

 

रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांचा व राज्यकारभाराचा खरा साक्षीदार असा हा रायगड किल्ला. महाडपासून २५ कि.मी. वर असलेला हा दुर्ग गांधारी व काळ अशा दोन नद्यांच्या उगमस्थानाजवळ वसलेला आहे. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक याच किल्ल्यावर इ. स. १६७४ मध्ये संपन्न झाला.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

रायगड जिल्ह्यालती दळणवळण सोयी:

Category:

 

महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भर घालणारा मुंबई-पुणे हा द्रुतगती मार्ग पनवेल, खोपोली या तालुक्यांतून जातो. तसेच या जिल्ह्यातून मुंबई – पुणे – बंगलोर (राष्ट्रीय महामार्ग क्र. ४) व मुंबई – गोवा – मंगलोर महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग क्र. १७) असे दोन महामार्गही जातात.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

रायगड जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

Category:

 

थळ-वायशेत येथे राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स हा सार्वजनिक क्षेत्रातील खत-प्रकल्प कार्यरत आहे. पनवेल तालुक्यात रसायनी येथे हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स हा प्राथमिक रसायने तयार करण्याचा प्रकल्प असून येथे मोठ्या प्रमाणावर प्रतिजैविकांची (अँटीबायोटिक्स) निर्मिती केली जाते.

  June 23, 2015


शहरे आणि गावे

रायगड जिल्ह्याचा इतिहास

Category:

 

बाराव्या शतकात जिल्ह्यातील रायगड या डोंगराला तणस, राजिवर, रायरी, रायगिरी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात असे. दूरदृष्टी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देश व कोकणच्या सीमेवरील या किल्ल्याचे महत्त्व ओळखून येथेच राजधानी वसवली.

  June 23, 2015