लेखसंग्रह

सुएझ

Category:

 

सिंगापूर हुन येताना श्रीलंकेच्या गॅले बंदरावर क्रु चेंज साठी अर्धा तास थांबून जहाज सौदी अरेबियाच्या बंदरावर निघालं होत. पहिल्यांदाच 1 लाख टनापेक्षा जास्त कार्गो नेणाऱ्या तेलवाहू जहाजावर जॉईन झालो होतो. यापूर्वीची जहाजे 35 ते 40 हजार टन क्षमतेची होती. त्यांची लांबी 180 मीटर असायची पण आताच्या जहाजाची लांबी 250 मीटर पेक्षा जास्त होती तसेच उंची आणि रुंदी सुद्धा खूपच जास्त होती. एवढ्या मोठ्या जहाजाच्या इंजिन, इतर मशिनरी तसेच पंपिंग सिस्टीम वर यापूर्वी कामाचा अनुभव नव्हता.

  October 4, 2019


लेखसंग्रह

लाईफ ऑनबोर्ड

Category:

 

ज्युनियर रँक मध्ये असताना एकदा जहाजावर गेल्यावर पाच ते सहा महिने झाल्याशिवाय घरी यायला मिळत नव्हते आणि सिनियर रँक मध्ये आल्यावर तीन ते चार महिने मिळत नाही. सुट्टीच पण तसच पूर्वी पाच ते सहा महिने सलग सुट्टी घ्यायला मिळायची. तरीसुद्धा तीन ते चार महिने सलग सुट्टी एका वर्षात दोन वेळा मिळते. कामाचा त्रास आणि स्ट्रेस दोन्ही सहन करता येत पण घर आणि जवळच्यांपासून लांब राहणं नाही सहन करता येत. आपले संस्कार आणि कौटुंबिक वातावरण हे घरापासून लांब राहण्यासारखे नसतातच

  October 3, 2019


साहित्य - ललित

नऊ रंगाच्या पैठण्या

Category:

 

गणेशोत्सव मंडळांमध्ये असलेल्या स्पर्धेचे स्वरुप नवरात्रोत्सव मंडळांमध्ये सुध्दा बघायला मिळते आहे. गरबा नाच करणाऱ्यांसाठी विविध व आकर्षक बक्षिसे, रंगीबेरंगी साड्या, पैठण्या , फॅन्सी ड्रेस आणि मग बक्षीस समारंभ आणि पुरस्कार सोहळे. नऊ दिवस कार्यक्रमांची नुसती रेलचेल सुरू असते.

  October 3, 2019


कथा

अजब न्याय नियतीचा – भाग २०

Category:

 

पण आपण असं काय वागलो की तिला आपल्याबद्दल असा संशय यावा? आपली  दी आपल्याबद्दल असा विचार कसं काय करू शकते याचे तिला आश्चर्य वाटत होतं.  मग गढीवर गेल्यावर आपल्यामुळं त्या दोघांच्यात भांडण झालं असेल? आपल्यामुळं राज दीला कायमचा सोडून गेला असेल? बापरे…. विचार करून करून आरूचं डोकं ठणकायला लागलं..

  October 3, 2019


लेखसंग्रह

फ्लोटिंग ड्राय डॉक

Category:

 

मुंबईहून दुबई आणि दुबईहून ऑस्ट्रिया मधील व्हिएन्ना साठी फ्लाईट पकडली होती. युरोप मध्ये उन्हाळा सुरु होता तरीपण व्हिएन्नाला लँडिंग करताना विमानाच्या खिडकीतून बाहेर बघितल्यावर जिकडे तिकडे हिरवगार आणि लुसलुशीत गवत दिसत होतं. बाहेरच तापमान 12 डिग्री असल्याची माहिती पायलट ने टॅक्सी वे वर असताना दिली.

  October 2, 2019