कथा

सिंह आणि चर्मकार

Category:

 

फार फार वर्षांपूर्वी एकदा एका खेडेगावात एक चर्मकार राहात होता. त्याचा एक छोटासा ग्रामधंदा होता. तो धंदा चांगला चालावा म्हणून त्याला असंख्य कातड्यांची गरज लागत असे. तो अरण्यात जात असे आणि मेलेल्या जनावरांची कातडी गोळा करीत असे. एखादे मेलेले जनावर त्याला आढळले की तो त्याची कातडी सोलायचा.

  October 22, 2025


कथा

ससा आणि कासवाची शाळा

Category:

 

ससा आणि कासव म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर एकच गोष्ट उभी राहते ती म्हणजे ‘ससा व कासवाची शर्यत’. पण माझी गोष्ट यापेक्षा निराळीच आहे बरं का.

  October 22, 2025


कथा

सिंह आणि ससा

Category:

 

मध्य भारतातल्या एका प्रचंड मोठ्या जंगलात एक दांडगा सिंह राहात होता. त्याचं नाव होतं भासुरक. त्याला स्वतःच्या शक्तीची घमंड होती. नि ह्या शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी तो खुशाल दुबळ्या जनावरांना ठार मारीत असे. एकदा काय झालं, त्या जंगलातली सगळी जनावरं एकत्र जमली आणि सगळी सिंहाकडे गेली.

  October 22, 2025


कथा

सशाचं हृदय

Category:

 

कोणे एके काळी समुद्राच्या तळाशी एक महाल होता. या महालात विविध प्रकारचे मासे, कासव आणि साप राहत असत. एके दिवशी सापांचा राजा पोटदुखीमुळे इकडेतिकडे सरपटत होता. दिवसरात्र वेदना असह्य झाल्यामुळे तळमळत होता. त्याच्या कुटुंबातील राजकुमार, राजकन्या, राणी, प्रधान सगळेच काळजी करू लागले. काय करावं कुणालाच काही सुचत नव्हते आणि राजाच्या वेदनाही कुणाला बघवत नव्हत्या. प्रधान म्हणाले, “आपण आपले मुख्य राजवैद्य माशाला बोलावू.” राजवैद्यांनी राजाची नाडी पाहिली आणि म्हणाले, ”महाराजांना सशाचं हृदय उकडून खायला दिलं तर लवकर आराम पडेल.”

  October 22, 2025


कथा

मोती पोवळ्याची मोष्ट

Category:

 

एका गावात एक वृद्ध शेतकरी राहत होता. तो आंधळा होता. त्याला दिसत नसे. एके दिवशी चालता चालता तो विहिरीत पडला. तेव्हा “देवा मला वाचव रे” असे तो ओरडू लागला.

  October 22, 2025


लेखसंग्रह

मुंबईची महालक्ष्मी, गव्हर्नर हॉर्नबी आणि दादाजी धाकजी

Category:

 

सात बेटांची मुंबई एकसंध नव्हती. इथे व्यापार वाढूच शकला नसता. सर्वत्र माजलेली दलदल, सुकत घातलेली मासळी, त्यापासून बनविला जाणारा खताचा कुटाणा,अनेक प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि कीटक, भरतीबरोबर खाऱ्या पाण्याने भरून जाणारी सातही बेटे, सतत चिखल यामुळे इथे जमिनीवरून मोठी वाहतूक करणे शक्य नव्हते.

  October 17, 2025


अरुणाचल प्रदेश – उगवत्या सूर्याची भूमी (लँड ऑफ rising sun)
पर्यटनस्थळे

अरुणाचल प्रदेश – उगवत्या सूर्याची भूमी (लँड ऑफ rising sun)

Category:

 

भारताच्या नकाशाकडे पाहीलं, की पूर्वेकडच्या टोकाशी डोंगररांगांमध्ये सामावलेलं एक राज्य आपल्याला दिसतं – अरुणाचल प्रदेश. नावाप्रमाणेच भारतात सर्वप्रथम सूर्य इथेच डोकावतो. सकाळच्या पहिल्या किरणांनी हिमालयाच्या कड्यावर पडलेलं सोनसळी तेज, दऱ्यांमधली धुक्याची चादर आणि शांत डोंगर वेडं वातावरण – प्रवाशाला नकळत मोहवून टाकतं.

  October 16, 2025


लेखसंग्रह

श्री महालक्ष्मी मंदिर, वेणगाव, कर्जत

Category:

 

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात या देवीची ही त्रिगुण रूपे पाहावयास मिळतात. तेथे महालक्ष्मीबरोबरच महाकाली आणि महासरस्वती विराजमान आहे. देवी माहात्म्यातील पौराणिक आख्यायिकेनुसार, महालक्ष्मीनेच तमोगुण आणि सत्त्वगुणांपासून ही दोन रूपे निर्माण केली व त्यांना आपापल्या गुणांनी योग्य असा स्त्री–पुरुषांचा एकेक जोडा उत्पन्न करण्यास सांगितले. त्यातून पुढे विश्वाची व सृष्टीची निर्मिती झाली.

  October 15, 2025


लेखसंग्रह

श्री ब्रम्हदेव मंदिर

Category:

 

पुराणांनुसार ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांपैकी ब्रह्मा ही पहिली देवता आहे. तो ब्रह्मांडाचा निर्माता मानला जातो. पुराणकथांनुसार विश्वनिर्मात्याने सर्वप्रथम ब्रह्मांडिय जल निर्माण केले व त्यात एक बीज टाकले. त्यापासून सोनेरी ब्रह्मांडिय अंडे तयार झाले. त्या अंड्यातून एक हजार वर्षांनी सृष्टीकर्त्याने स्वतः ब्रह्माच्या रूपात जन्म घेतला.

  October 13, 2025


लेखसंग्रह

श्री हरिहरेश्वर मंदिर

Category:

 

हिरवीगार वनराई, निळाशार समुद्र आणि रुपेरी वाळूच्या किनाऱ्यावर असलेले श्रीवर्धन तालुक्यातील श्रीक्षेत्र हरिहरेश्वर येथे महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे. पेशव्यांचे कुलदैवत असलेले हे मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या या स्थानाची ‘दक्षिण काशी’ म्हणून ख्याती आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सरखेल कान्होजी आंग्रे आणि पेशवे घराण्यातील अनेकांनी येथे दर्शन घेतल्याच्या नोंदी आहेत.

  October 11, 2025