माता विठ्ठल ..पिता विठ्ठल ! ( बेवड्याची डायरी – भाग २२ वा )
Category:
अवर्गिकृत..सर ईश्वरी शक्ती बदल सांगत असताना मला लहानपणी ऐकलेला संत नामदेवांचा अभंग आठवला ..ज्यातील एका कडव्यात ‘ माता विठ्ठल ..पिता विठ्ठल ..बंधू विठ्ठल ..गोत्र विठ्ठल ..गुरु विठ्ठल ..गुरु देवता विठ्ठल ..निधान विठ्ठल ..निरंतर विठ्ठल ‘ असे म्हंटले गेले होते ..म्हणजे संतानी पण निसर्ग ..नातीगोती ..गुरुजन ..समाज..यांनाच विठ्ठल म्हणजे ईश्वर मानले होते तर !