पालखी आणू नका दारात माझ्या
Category:
साहित्य - ललितप्रदीप निफाडकरांची गझल
April 16, 2010
Category:
साहित्य - ललितप्रदीप निफाडकरांची गझल
April 16, 2010
Category:
साहित्य - ललितप्रदीप निफाडकरांची गझल
April 16, 2010
Category:
साहित्य - ललितमला अजून आठवतं, मी विचारत होतो, परमेश्वर म्हणजे काय? तो खरेच अस्तित्वात असतो का? माझ्या प्रश्नावर मी खूष होतो. कारण माझ्या प्रश्नाचं उत्तर तर्कशुद्ध पद्धतीनं देता येणार नाही असं मला वाटत होतं. एका अर्थानं एका पत्रकारानं एका आध्यात्मिक गुरूला विचारलेला तो प्रश्न होता. प्रश्नामागे उत्तर मिळविण्याच्या अभिलाषेपेक्षा समोरच्या व्यक्तीला निरुत्तर करण्याचा इरादा अधिक होता.
April 6, 2010
Category:
लेखसंग्रह२१ सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झेमर्स दिन म्हणून ओळखला जातो. साजरा केला जातो असे म्हणणे चुकीचे ठरेल कारण आनंद देणारे क्षण किंवा विषय साजरे केले जातात. अल्झेमर्स मध्ये खूप यातना दडल्या आहेत. अल्झेमर्स डिसीज म्हणजे काय, तो कोणी शोधून काढला, त्याची लक्षणे काय असतात, काय काळजी घ्यावी लागते, होऊ नये म्हणून काही उपाय करणे शक्य आहे का, आधुनिक वैद्यक शास्त्र ह्या विषयी काय सांगते अल्झेमर्स दिसीज बद्द्ल आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय आहे ह्या विषयी जाणून घेऊ या.
January 11, 2010
Category:
साहित्य - ललितरोजचे वर्तमानपत्र उघडले रे उघडले, की बलात्कार, दरोडे, खून, लफडी, घोटाळे, अब्जावधी-कोट्यवधी बेनामी मालमत्तेचा पोलिसांनी लावलेला शोध, खोट्या चलनी नोटांचे कारखाने या अशा बातम्या वस्सकन अंगावर येतात. संघटित गुन्हेगारी, पोलीस खात्याची बदनामी हे विषय तर वर्तमानपत्रात रतीब घालणारे विषय झाले आहेत. रोज सकाळी वृत्तपत्र वाचून मन विषण्ण होते, सुन्न होते. काही इंग्रजी वृत्तपत्रांत, विशेषत या दैनिकांच्या रविवार पुरवण्यात स्वैर सेक्स, पोर्नोग्राफी यांना प्रतिष्ठा देणारे लेख वाचायला मिळतात.
May 30, 2006
Category:
साहित्य - ललितमनातील वादळे तिथल्या तिथे शमविण्याचा प्रयत्न करणे, माझ्य मते न्याय्य होणार नाही. या वादळांना वाट मोकळी करून दिल्यास दिलासा मिळेल, अशी आशा वाटते. परवा नौशाद अली आमच्यातून गेले अन काय लिहू काय नाही असे वाटायला लागले. `न मिलता गम तो बरबादी के अफसाने कहाँ जाते? अगर दुनिया चमन होती तो विराने कहाँ जाते?’ असे म्हणून मनाची समजूत घालावी, की `सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगी?’ असे म्हणत स्मृतींना उजाळा द्यावा? जन्नतमध्ये नौशादसाहेबांची मैफील शकील बदायुनी, शैलेंद्र, मदन मोहन, रफी यांच्यासोबत रंगेल का? अनेक वेड्या प्रश्नांनी भंडावून सोडणारे मन! बहिणाबाईंनी म्हटलेच आहे, `मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला हाकला परी येत पिकावर!’ माणसाचे आयुष्य फारतर पाचपन्नास वर्षांचे.
May 23, 2006
Category:
साहित्य - ललितमाणसाचं मन असतं कुठे? त्यात काय, काय असतं? ते सगळं आपल्याला कळतं का? माणूस मनाचा वापर करतो, की मन आपल्यावर स्वार होतं? असे एका ना दोन अनेक प्रश्न प्रदीर्घ काळ माझं मन कुरताडत असतं. अस्वस्थ करीत असतं. माझ्या वयाच्या अकराव्या वर्षी मी पहिली चोरी केली. एका पानटपरीवाल्याचे आठ रुपये पंचेचाळीस पैसे मी लांबविले. ती घटना मी विसरलो, असं समजत होतो. नित्यजीवनावर त्या घटनेचे काही परिणामही जाणवत नव्हते; पण दहा वर्षांच्या कालावधीनंतर जेव्हा मी त्या पानवाल्याकडे या चोरीची कबुली दिली, त्याचे पैसे दामदुपटीने परत केले तेव्हा कळलं, की माझी चोरी त्याला त्याचवेळी ज्ञात होती. तो काही बोलला नव्हता. त्या दहा वर्षांत त्यानं कधीही या घटनेची आठवणही मला करून दिलेली नव्हती. मी चोर नाही, माझा सद्सद्विवेक जागा आहे, असा त्याचा विश्वास होता. एका अर्थानं चूक कबूल केल्यानंतरही तोच जिंकला होता. एक साधा पानवाला; पण मनाच्या नीतळपणाची साक्ष तो अजूनही मला देत असतो.
April 25, 2006
Category:
साहित्य - ललितही गोष्ट आहे माझ्या एका मित्राची. खरं तर ही कोणाचीही असू शकेल. कारण ही गोष्ट माझीच तर नाही, असंही अनेक वेळा मलाच वाटून गेलेलं आहे. तर हा मित्र आणि आणखी एक सहकारी आम्ही मुंबईला गेलो होतो. कामकाज आटोपल्यावर लिंकिंग रोडला सहज फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलो. रस्त्यावरची दुकानं आणि तयार कपड्यांचे ढीग आम्हाला आकर्षित करीत होते. अखेर एका ठिकाणी थांबलो. काही शर्ट-टी शर्ट पाहिले. माझ्या मित्राला एक टी शर्ट आवडला. त्यानं तो घेतला. दोनशे रुपये किंमत होती, ती दिली. येताना अर्थातच चर्चेचा विषय होता, तो खरेदीचा, त्या टी शर्टचा. “शर्ट चांगलाय, पण त्याचा रंग आणि आडवे पट्टे हे काही तुला शोभणार नाही,” एकानं आपला अभिप्राय दिला. “कधी तरी वेगळं काही घालून पाहायला हवं,” मित्रानं त्याला प्रत्त्युत्तर दिलं.
April 22, 2006
Category:
साहित्य - ललितवर्षापूर्वीची गोष्ट. आर्थिक व्यवहारात फसल्याने माझ्या एका मित्राला कोर्टाचा दरवाजा खटखटावा लागला. `खरे तर कोर्टाची पायरी नको रे बाबा’ हे सगळ्याच सामान्य माणसांचे सूत्र. तर हे महाशय कोर्टात गेले. न वटलेल्या चेकची ती केस. अर्थातच फौजदारी. प्रतिपक्षही काही कमी नव्हता. त्यांनी माझ्या मित्रावर फसवणुकीचीच फिर्याद ठोकली. `एक तर कोर्टाची पायरी चढू नये; अन्यथा सर्व काय ते सहन करावे.’ हे सांगण्यासाठी सोपे आहे; पण प्रत्यक्षात अशा प्रसंगाने काय होते, याचा अनुभव मी या माझ्या मित्राबरोबर घेतला.
April 20, 2006
Copyright © 2025 | Marathisrushti