आता परकं वाटू लागलं आहे

तुझ्या आठवणींचं ओझं, श्वासावर चढू लागलं आहे
कळत नकळत तुझं घर आता परकं वाटू लागलं आहे.

कधीकाळी ज्यात हसणं होतं, संवादांची गर्दी होती
त्या भिंतींना आज माझं अस्तित्वच नकोसं झालं आहे.

तुझ्या नावाचा सुगंध अजून उरात साठवून आहे
पण त्या सुवासालाही आता एकटेपण जाणवत आहे.

मी शब्दांना दोष देऊ , की नशिबालाच दोष देऊ
प्रत्येक ओळीत माझा पराभव ठसठशीत लिहिला आहे.

जिथं प्रेमाला भविष्य होतं, स्वप्नांना हात होते
त्या वळणावरच सारा रस्ता आज अंधार पांघरून आहे.

तू नाहीस, हे सत्य मी रोजच स्वतःला सांगतो
पण आरसा मात्र अजूनही तुझंच नाव विचारत आहे.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे

Author