अंकनाद

पुस्तकाबाहेरच्या अनेक बार्बीमधून पुस्तकांमधील संबोध स्पष्ट करता येतात, म्हणून पुस्तकाच्या पलीकडे शोध घेणं आवश्यक असतं. पुस्तकातल्या काही गोष्टी मुलांना अभ्यासायला नकोशा वाटतात. गणित या विषयाची काही मुलांना भीती वाटते, तो विषय त्यांना कंटाळवाणा वाटतो आणि म्हणून पुस्तकापासून ते दूर राहातात, अशा मुलांची ही भीती दूर व्हावी म्हणून अंकनाद गणिताची सात्मीकरण प्रणाली, विद्यार्थ्यांची गणिताशी मैत्री घडवते.



पुस्तकाबाहेरच्या अनेक बार्बीमधून पुस्तकांमधील संबोध स्पष्ट करता येतात, म्हणून पुस्तकाच्या पलीकडे शोध घेणं आवश्यक असतं. पुस्तकातल्या काही गोष्टी मुलांना अभ्यासायला नकोशा वाटतात. गणित या विषयाची काही मुलांना भीती वाटते, तो विषय त्यांना कंटाळवाणा वाटतो आणि म्हणून पुस्तकापासून ते दूर राहातात, अशा मुलांची ही भीती दूर व्हावी म्हणून अंकनाद गणिताची सात्मीकरण प्रणाली, विद्यार्थ्यांची गणिताशी मैत्री घडवते.

असं म्हटलं जातं की, गणित ही सर्व विज्ञान शाखांची जननी आहे. किंबहुना, जीवनाच्या प्रत्येक अंगाशी गणित जोडलेले आहे. आकडे, मोजमाप, परिमाण अशा गणितातील संकल्पना वापरूनच आपले दैनंदिन व्यवहार सुरू असतात.

लहानपणी वापरलेल्या दूर, जवळ, उंच, लहान, मोठं, छोटं अशाच संकल्पना नंतर गणितीय भाषेत सांगितल्या जातात. आकडे, पाढे, समीकरणे, प्रमेय सिद्धांताच्या संकल्पनामधून आपण गणित आत्मसात करीत असतो आणि त्याचा दैनंदिन जीवनात, व्यवहारात उपयोग करीत असतो. गणित उत्तरं शोधायला शिकवतं, पुस्तकात उदाहरण दिलेलं असतं पण त्याचे उत्तर विद्यार्थ्यांना शोधावं लागतं. गणित ज्ञानाचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त करतं. शोध लागण्याचा आनंद मिळवून देतं, या आनंदाने शोधाचा ध्यास लागतो व गणिताची गोडी निर्माण होते. एकदा गोडी निर्माण झाली की प्रत्येक गोष्ट सोपी होते. मात्र शालेय अभ्यासक्रमात गणित या विषयाबद्दल मुलांमध्ये जी भीती आहे ती घालवण्यासाठी अंकनादने गणिताची सात्मीकरण प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली तीन टप्प्यांत विभागली जाते.
१)श्रवण संस्कार – शाळांच्या वर्गामध्ये अंकनाद (mp3encoded layer) बसवावे किंवा अंकनाद मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपल्या पाल्यांसाठी नादमय पाढे उपलब्ध करून द्यावे. नादमय पाढे वारंवार कानावर पडल्याने पाढ्यांचे सात्मीकरण (assimilation) करणे सुलभ जाते.

2)अंकनाद मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये अभ्यासक्रमात असलेले ३० पर्यंतचे पाढे आहेतच, त्यासोबत अपूर्णांकांचे पाढेसुद्धा आहेत. यात अंक उच्चार, पावकी, निमकी, पाऊणकी सवायकी, दिडकी, अडीचकी, औटकी आणि वर्ग आणि इंग्लिश टेबल्स एक ते शंभर याचा समावेश आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तार्किक दृष्टिकोनातून विचार करण्याची क्षमता यामुळे वाढते. व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करता येते आणि दशांश अपूर्णांकाचे रूपांतर व्यवहारी अपूर्णांकात करता येते. दिलेल्या अपूर्णांकांच्या सममूल्य अपूर्णांक शोधता येतात व तयार करता येतात. अपूर्णांकाचे गुणाकार व भागाकार सहज करता येतात, अपूर्णांकांची उदाहरणे सोडविणे सोपे जाते. पाढ्यांच्या सात्मीकरणाने उजव्या मेंदूचा विकास होतो, मुलांचं गणित सोडविण्याचा वेग वाढतो. स्वाभाविकपणे मुलांच्या मनातून गणिताची भीती दूर होऊन आत्मविश्वास वाढतो.
१) पाढे पाठांतर व सात्मीकरण स्पर्धा
यासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले जाते. पहिल्या टप्प्यात स्पर्धकांनी आत्मसात केलेल्या पाढ्यांचे सादरीकरण केले जाते व दुसऱ्या टप्प्यात मुलाखतीच्या माध्यमातून आत्मसात केलेल्या पाठ्यांचे दैनंदिन उपयोजन कसे केले जाते हे तपासून स्पर्धकाचे अवलोकन केले जाते.

२) टप्पा तिसरा – गणितालय
गणितालय ऑनलाइन पोर्टल – गणितातील मुळातच हुशार विद्यार्थ्यांसाठी अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत; पण सर्वसामान्य मुलांची गणिताची भीती कमी करण्यासाठी गणितालय नावाचा उपक्रम राबवला जातो आणि ‘गणितालय’ म्हणजे काय तर त्यात ‘गणिताच्या असंख्य सोप्या पद्धतीचे आणि गमतीजमतीचे आलय’ वाढत्या इयत्तानुसार कठीण होत जाणाऱ्या गणितातील प्रक्रिया सुलभ करून गणितालय या इंटरॅक्टिव्ह प्लॅटफॉर्मवरून विद्यार्थ्यांशी संवाद साधला जातो. गणित म्हणजे केवळ आकडेमोड न राहाता त्याचे सर्वस्पर्शीत्व जर गणित शिकणाऱ्याला समजले तर त्याची या विषयातील रुची वाढेल. इथे गणितातील युक्त्या सांगितल्या जात नाहीत, तर गणिताच्या मूलभूत संकल्पना आणि रचना यांचा पाया मजबूत केला जातो. गणितालय पोर्टलचे मोफत सभासदत्व अंकनादच्या वापरकर्त्यांना आणि पाढे पाठांतर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना दिले जाते. तसेच मुलांना स्थानिक यशस्वी व्यक्ती, अभ्यासक्रम आधारित विषय तज्ज्ञ आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, गणितज्ज्ञ आणि वैज्ञानिकाचे मार्गदर्शन लाभते.

यापूर्वी फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवरील वेबिनार माध्यमातून अंकनादने आतापर्यंत गणित आणि दैनंदिन आयुष्यातील व्यवहार संगीत, नृत्य, मानसशास्त्र यांचा कसा घनिष्ठ संबंध आहे, हे सांगितले.
ज्या विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते आणि ज्यांना गणितात अधिक मिळवायचे आहेत. त्यांच्यासाठी हा स्तुत्य उपक्रम निश्चितच फायदेशीर ठरेल.

Author