अग्निजा आणि सख्याचा दिवा- द्रौपदी

यज्ञाच्या धगधगत्या कुंडातून ती उगवली,
जणू अग्नीनेच मानवी रूप धारण केलं.
राखेतून उठलेली ज्वाला
नाव तिचं द्रौपदी.

तिच्या जन्मातच एक प्रतिज्ञा होती,
अपमानाच्या सावलीतून उभं राहण्याची.
ती फक्त कन्या नव्हती द्रुपदाची,
ती काळाच्या कपाळावर उमटलेली रेषा होती.

स्वयंवरात तिच्या शब्दांनी
एका धनुर्धराच्या अंत:करणाला ठेस लागली.
एक “सूतपुत्र” हा उच्चार
इतिहासाच्या छातीत रुतून बसला.
चूक होती....
हो, मानवी...
पण त्या चुकीवर उभारलेलं अधर्माचं साम्राज्य
अधिक गडद होतं.

इंद्रप्रस्थातल्या एका हसण्याने
अहंकाराच्या किल्ल्याला तडा गेला.
हास्य क्षणभंगुर होतं,
पण सूडाचा प्रतिध्वनी दीर्घकाळ घुमला.

आणि मग ती सभा…
जिथे धर्म ग्रंथात उरला,
आचरणात नाही.

चौसरावर माणसं हरली,
पण हरवली गेली ती.
जणू ती श्वास नसून दावणीला बांधलेली वस्तू होती.

तिच्या डोळ्यांत अश्रू नव्हते तेव्हा,
तेथे प्रश्न होते.
“स्वतःला हरवलेला पती
पत्नीचा स्वामी कसा?”

सभागृहात शस्त्रं शांत होती,
पण मौनानेच सर्वांत मोठी हिंसा केली.
भीष्मांच्या विवेकाला उत्तर सापडलं नाही,
द्रोणांच्या ज्ञानाला दिशा नव्हती,
धृतराष्ट्रांच्या अंधत्वाने
सत्यालाच अंध केलं.
विदुरांच्या विवेकाला साखळदंड होता.
मौनानेच अन्यायाला वस्त्र दिलं.

त्या क्षणी ती एकटी नव्हती,
तिच्या आक्रोशात संपूर्ण स्त्रीत्व उभं होतं.

आणि जेव्हा सर्व नाती तुटली,
तेव्हा एका सख्याची उपस्थिती
आकाशासारखी तिच्यावर पसरली
अर्थात श्रीकृष्ण....

तो तलवार घेऊन आला नाही,
तो धर्माचा उपदेश घेऊनही आला नाही.
तो आला,
विश्वासाचा अदृश्य हात बनून.

तिच्या वस्त्रांची लाज राखताना
त्याने तिच्या आत्म्याला सांगितलं,
“तू देह नाहीस, तू अस्मिता आहेस.”

त्या क्षणी चमत्कार फक्त वस्त्रांचा नव्हता,
तो होता नात्याचा.
जिथे देव आणि भक्त नव्हते,
होता फक्त सखा आणि सखी.

ती कोसळली नाही,
कारण तिच्या पाठीशी उभं होतं..
एखादं शस्त्र नव्हे,
तर समजून घेणारं मौन.

युद्ध पेटलं,
रक्ताने पृथ्वीला किंमत मोजावी लागली.
सूड जिंकला की न्याय,
हा प्रश्न अजूनही हवेत आहे.

विजयानंतरही तिच्या मनात
सभागृहाचं प्रतिध्वनी घुमत राहिला असेल,
कारण रणभूमी जिंकूनही
आत्म्याची हरवलेली शांतता
कोण परत देऊ शकतं?

द्रौपदी म्हणजे
अपमानावर उभं राहिलेलं धैर्य,
चुकीवर प्रश्न विचारणारी बुद्धी,
आणि सख्याच्या आधाराने
स्वतःला हरवू न देणारी चेतना.

ती शिकवून जाते,
परिस्थिती अंधार देऊ शकते,
लोक मौन धारण करू शकतात,
पण एक जरी सखा
विश्वासाने उभा असेल,
तर आत्म्याचा दिवा विझत नाही.

आणि जिथे आत्म्याचा दिवा जळत राहतो,
तिथे इतिहास केवळ रक्ताने नाही,
तर स्वाभिमानाने लिहिला जातो.

द्रौपदी म्हणजे
जन्म, अपमान, प्रश्न आणि ज्वाला
यांचं एकाच वेळी धगधगतं रूप.

आणि शेवटी ती सांगून जाते,
युद्ध जिंकलं तरी इतिहास शांत होत नाही.
स्त्रीचा सन्मान जपला गेला नाही तर,
प्रत्येक सभागृह हे
कुरुसभाच ठरते.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212



यज्ञाच्या धगधगत्या कुंडातून ती उगवली,
जणू अग्नीनेच मानवी रूप धारण केलं.
राखेतून उठलेली ज्वाला
नाव तिचं द्रौपदी.

तिच्या जन्मातच एक प्रतिज्ञा होती,
अपमानाच्या सावलीतून उभं राहण्याची.
ती फक्त कन्या नव्हती द्रुपदाची,
ती काळाच्या कपाळावर उमटलेली रेषा होती.

स्वयंवरात तिच्या शब्दांनी
एका धनुर्धराच्या अंत:करणाला ठेस लागली.
एक “सूतपुत्र” हा उच्चार
इतिहासाच्या छातीत रुतून बसला.
चूक होती….
हो, मानवी…
पण त्या चुकीवर उभारलेलं अधर्माचं साम्राज्य
अधिक गडद होतं.

इंद्रप्रस्थातल्या एका हसण्याने
अहंकाराच्या किल्ल्याला तडा गेला.
हास्य क्षणभंगुर होतं,
पण सूडाचा प्रतिध्वनी दीर्घकाळ घुमला.

आणि मग ती सभा…
जिथे धर्म ग्रंथात उरला,
आचरणात नाही.

चौसरावर माणसं हरली,
पण हरवली गेली ती.
जणू ती श्वास नसून दावणीला बांधलेली वस्तू होती.

तिच्या डोळ्यांत अश्रू नव्हते तेव्हा,
तेथे प्रश्न होते.
“स्वतःला हरवलेला पती
पत्नीचा स्वामी कसा?”

सभागृहात शस्त्रं शांत होती,
पण मौनानेच सर्वांत मोठी हिंसा केली.
भीष्मांच्या विवेकाला उत्तर सापडलं नाही,
द्रोणांच्या ज्ञानाला दिशा नव्हती,
धृतराष्ट्रांच्या अंधत्वाने
सत्यालाच अंध केलं.
विदुरांच्या विवेकाला साखळदंड होता.
मौनानेच अन्यायाला वस्त्र दिलं.

त्या क्षणी ती एकटी नव्हती,
तिच्या आक्रोशात संपूर्ण स्त्रीत्व उभं होतं.

आणि जेव्हा सर्व नाती तुटली,
तेव्हा एका सख्याची उपस्थिती
आकाशासारखी तिच्यावर पसरली
अर्थात श्रीकृष्ण….

तो तलवार घेऊन आला नाही,
तो धर्माचा उपदेश घेऊनही आला नाही.
तो आला,
विश्वासाचा अदृश्य हात बनून.

तिच्या वस्त्रांची लाज राखताना
त्याने तिच्या आत्म्याला सांगितलं,
“तू देह नाहीस, तू अस्मिता आहेस.”

त्या क्षणी चमत्कार फक्त वस्त्रांचा नव्हता,
तो होता नात्याचा.
जिथे देव आणि भक्त नव्हते,
होता फक्त सखा आणि सखी.

ती कोसळली नाही,
कारण तिच्या पाठीशी उभं होतं..
एखादं शस्त्र नव्हे,
तर समजून घेणारं मौन.

युद्ध पेटलं,
रक्ताने पृथ्वीला किंमत मोजावी लागली.
सूड जिंकला की न्याय,
हा प्रश्न अजूनही हवेत आहे.

विजयानंतरही तिच्या मनात
सभागृहाचं प्रतिध्वनी घुमत राहिला असेल,
कारण रणभूमी जिंकूनही
आत्म्याची हरवलेली शांतता
कोण परत देऊ शकतं?

द्रौपदी म्हणजे
अपमानावर उभं राहिलेलं धैर्य,
चुकीवर प्रश्न विचारणारी बुद्धी,
आणि सख्याच्या आधाराने
स्वतःला हरवू न देणारी चेतना.

ती शिकवून जाते,
परिस्थिती अंधार देऊ शकते,
लोक मौन धारण करू शकतात,
पण एक जरी सखा
विश्वासाने उभा असेल,
तर आत्म्याचा दिवा विझत नाही.

आणि जिथे आत्म्याचा दिवा जळत राहतो,
तिथे इतिहास केवळ रक्ताने नाही,
तर स्वाभिमानाने लिहिला जातो.

द्रौपदी म्हणजे
जन्म, अपमान, प्रश्न आणि ज्वाला
यांचं एकाच वेळी धगधगतं रूप.

आणि शेवटी ती सांगून जाते,
युद्ध जिंकलं तरी इतिहास शांत होत नाही.
स्त्रीचा सन्मान जपला गेला नाही तर,
प्रत्येक सभागृह हे
कुरुसभाच ठरते.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212

Author