स्वच्छ भारतासाठी फिरली मोदींची झाडू,
आपणही सहभाग घेवून, चला वेळ काढू,
नेते लागले कामाला, अभिनेते सरसावले स्वच्छतेला,
कामगार म्हणाले आम्ही का मागे राहू, आम्ही सुद्धा येतो घाम गाळायला,
मिडिया आली, प्रेस आली,
खटाखट कॅमेरान्ची बटने दाबली,
चित्रे दिसली गोजिरवाणी,
नाही नां येणार वेळ लाजिरवाणी?
गांधींच्या नावावर मोदिनी,
मोट बांधली गांधी दिनी……………
— श्री.मयुर गंगाराम तोंडवळकर
Author
Post Views: 12