पुरुष

 



स्त्रियांवर होणार्‍या बलात्कारास

कारण स्त्रियांचे तोकडे कपडे

हल्ली पुरुष सहज म्हणून जातो …

स्त्रियांचा प्रती त्याच्या नजरेत

असणार्‍या प्रेम वजा वासनेला

पुरुष सहजच नजरेआड करतो ….

आपल्या पुरुषत्वाची ताकद

जगाच्या कल्याणासाठी आजमावयाची

तर पुरुष ती हल्ली स्त्रियांवर आजमावतो …

कळत नाही आजही पुरुष

स्त्रियांना आपल्या ताटाखालचं

मांजर का समजतो ….

स्त्रियांनी कसं राहावं , कसं वागावं

कसं बोलावं , कसं चालावं हे

पुरुष ठरवूच कसा पाहतो…

स्त्री एक स्वतंत्र व्यक्ती आहे

स्वतंत्र विचाराची हे पुरुष

आजही स्विकारणं का टाळतो …

पुरुषातील हिंस्र पुरुषच स्त्रियांवर

बलात्कार करतो पण याचा दोषी

मात्र त्यांच्या पोशाखाला धरतो …

पुरुष स्वतःचा पुरुषी अहंकार गोंजारत

स्त्रियांवर होणार्‍या अन्यायाला त्यांनाच

जबाबदार ठरवून नेहमीच मोकळा होतो …

कवी – निलेश बामणे

— निलेश बामणे

Author