क्रिकेट

क्रिकेट 



क्रिकेट तसा माझा

आवडता खेळ नाही …

एक – दोन सोडले

तर बाकीच्या क्रिकेट खेळाडूंची

नावे ही मला माहीत नाही …

भारत – पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यात

कोण जिंकला यापेक्षा अधिक घेण नाही …

क्रिकेटच्या अज्ञानामुळे त्यावर कोणाशी

पैज लावण्याचा प्रश्नच आला नाही…

सध्या देशात क्रिकेट वादग्रस्त

त्यामुळे टी.व्ही वर

क्रिकेटमय बातम्या पाहण्याशिवाय

दुसरा पर्यायच नाही….

मेडियाला क्रिकेटच्या नशेत

देशातील दुष्काळाचा विसर तर

पडला नाही ना ?

हा प्रश्न स्वताच स्वताला विचारल्या

शिवाय आता राहवत नाही….

देशातील लोकांचा ताप

वाढत्या तापमानामुळे वाढलाय

कि आय .पी. एल . च्या क्रिकेट सामन्यांमुळे

तेच कळत नाही …

कवी – निलेश बामणे

— निलेश बामणे

Author