चिमणी

बऱ्याच दिवसानंतर मोकळ्या नभात
उडताना एक चिमणी दिसली

चिव - चिव करत घरात माझ्या
नजरेसमोरून ती उडत गेली

आमच्या घरासमोरच्या पूर्वीच्या मोकळ्या
अंगणाची आठवण करून गेली

मागे कधी आजीने सांगितलेल्या
चिमणीच्या गोष्टीची आठवण देऊन गेली

बऱ्याच दिवसापासून फक्त चित्रात दिसणारी
चिमणी आज प्रत्यक्षात सामोरी आली

बऱ्याच वर्षानंतर आमच्या घरात
जणू ती नवीन पाहुनीच आली

चिमण्या घटता आहेत प्रदूषणामुळे
याची जणू सूचनाच घेऊन आली

कवी - निलेश बामणे



बऱ्याच दिवसानंतर मोकळ्या नभात
उडताना एक चिमणी दिसली

चिव – चिव करत घरात माझ्या
नजरेसमोरून ती उडत गेली

आमच्या घरासमोरच्या पूर्वीच्या मोकळ्या
अंगणाची आठवण करून गेली

मागे कधी आजीने सांगितलेल्या
चिमणीच्या गोष्टीची आठवण देऊन गेली

बऱ्याच दिवसापासून फक्त चित्रात दिसणारी
चिमणी आज प्रत्यक्षात सामोरी आली

बऱ्याच वर्षानंतर आमच्या घरात
जणू ती नवीन पाहुनीच आली

चिमण्या घटता आहेत प्रदूषणामुळे
याची जणू सूचनाच घेऊन आली

कवी – निलेश बामणे

Author