श्री वेंकटेशाची आरती – चित्रफित..

डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी लिहिलेली ही वेंकटेशाची आरती सादर केली आहे गायिका सौ रेखा कुलकर्णी यांनी….



श्री वेंकटेशाची आरती – चित्रफित..

डॉ. दिलीप कुलकर्णी
साहाय्य : स्वरूप फडणीस
गायिका: सौ रेखा कुलकर्णी


आरती वेंकटेशा
महालक्ष्मी वल्लभा
तूचि रे मोक्षदाता
भक्तवत्सला नाथा
वत्सला नाथा
आरती वेंकटेशा..।। धृ.।।

दिव्य चरण तुझे
स्वर्ग भक्तांसि भासे
लीन तये होऊनी
द्वारी पावती मोक्षा
पावती मोक्षा
आरती वेंकटेशा…..।। १।।

माता सर्व जगता
पद्मा वक्षे तुझिया
विहरूनी लीलया
हरिप्रिया चंचला
प्रिया चंचला
आरती वेंकटेशा…..।।२।।

पूजिती दिव्यमूर्ती
गाती भाविक कीर्ती
किरीट रत्नांकित
शोभे सुंदर माथा
सुंदर माथा
आरती वेंकटेशा…..।।३।।

पापे भक्तांची वारी
तव तू पुष्कराक्षा
शरण तुज आता
तारी मज कृपाळा
मज कृपाळा
आरती वेंकटेशा…..।। ४ ।।

यु ट्यूब लिंक : https://youtu.be/iHXnrfyOWlA

Author