भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी मीनाक्षी पंचरत्नम् सोबतच मीनाक्षी स्तोत्रम् या नावाची ही एक नितांत सुंदर रचना साकारली आहे.
यात आई मीनाक्षीचे वैभव वर्णन करतांना आचार्यश्री म्हणतात,
श्रीविद्यॆ- शाक्त संप्रदायाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या श्रीविद्या स्वरुपिणी. शिववामभागनिलयॆ- भगवान शंकरांच्या डाव्या भागात अर्थात येथे असणाऱ्या हृदयात निवास करणारी. श्रीराजराजार्चितॆ- सामान्य जीवावर सत्ता गाजवतो त्याला राजा म्हणतात. अनेक राजांवर सत्ता गाजवतो तो राजराज. अशा अनेक सम्राटांनी अर्चना केलेली.
श्रीनाथादिगुरुस्वरूपविभवॆ- भारतीय संस्कृतीत वैभवशाली उपासना मार्ग विद्यमान आहे त्यापैकी एक श्रेष्ठ मार्ग आहे नाथपंथ. हे सर्व नाथ आई जगदंबे ला आपली गुरु मानतात. तिचे हे गुरुस्वरूपच तिचे दिव्य वैभव आहे. चिन्तामणीपीठिकॆ - चिंतामणी रत्नाच्या आसनावर विराजमान असणारी.
श्रीवाणीगिरिजानुताङ्घ्रिकमलॆ - श्री म्हणजे देवी लक्ष्मी, वाणी म्हणजे देवी सरस्वती आणि गिरीजा म्हणजे देवी पार्वती, या त्रिगुणात्मिका तीन देवता जिच्या चरण कमलाला वंदन करतात अशी.
श्रीशांभवी- भगवान शंकरांची सहधर्मचारिणी.
श्रीशिवॆ- अत्यंत पवित्र, शुद्ध.
मलयध्वजाधिपसुतॆ- दक्षिणे मध्ये असणाऱ्या पांड्य राजवंशातील मलयध्वज राजा ने आपली पत्नी कांचनमाला हिच्यासोबत भगवान शंकराची तपश्चर्या केल्यावर त्यांच्या आशीर्वादाने कन्या रुपात प्रकट झालेल्या,
मध्याह्नॆ मां पाहि मीनाम्बिकॆ- हे मीनाम्बिके या मध्याह्न काळात माझे रक्षण कर.मध्याह्न समयी अर्थात दुपारी सूर्य मस्तकावर असणे हा सर्वाधिक तापदायक काळ. अशा या तापातून माझे रक्षण कर.
भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी मीनाक्षी पंचरत्नम् सोबतच मीनाक्षी स्तोत्रम् या नावाची ही एक नितांत सुंदर रचना साकारली आहे.
यात आई मीनाक्षीचे वैभव वर्णन करतांना आचार्यश्री म्हणतात,
श्रीविद्यॆ- शाक्त संप्रदायाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या श्रीविद्या स्वरुपिणी. शिववामभागनिलयॆ- भगवान शंकरांच्या डाव्या भागात अर्थात येथे असणाऱ्या हृदयात निवास करणारी. श्रीराजराजार्चितॆ- सामान्य जीवावर सत्ता गाजवतो त्याला राजा म्हणतात. अनेक राजांवर सत्ता गाजवतो तो राजराज. अशा अनेक सम्राटांनी अर्चना केलेली.
श्रीनाथादिगुरुस्वरूपविभवॆ- भारतीय संस्कृतीत वैभवशाली उपासना मार्ग विद्यमान आहे त्यापैकी एक श्रेष्ठ मार्ग आहे नाथपंथ. हे सर्व नाथ आई जगदंबे ला आपली गुरु मानतात. तिचे हे गुरुस्वरूपच तिचे दिव्य वैभव आहे. चिन्तामणीपीठिकॆ – चिंतामणी रत्नाच्या आसनावर विराजमान असणारी.
श्रीवाणीगिरिजानुताङ्घ्रिकमलॆ – श्री म्हणजे देवी लक्ष्मी, वाणी म्हणजे देवी सरस्वती आणि गिरीजा म्हणजे देवी पार्वती, या त्रिगुणात्मिका तीन देवता जिच्या चरण कमलाला वंदन करतात अशी.