त्याचे वेगळेपण

(Gold)
हा लेख अनघा प्रकाशनच्या दिवाळी २०२३ मधून घेतला आहे.
मनुष्याचा स्वार्थी स्वभाव काही आजचा नाही तो प्रत्येक युगात स्पष्टपणे दिसत आलेला आहे अगदी रामायण, महाभारत ते सध्याच्या कलियुगापर्यत. कधी- कधी तर असे वाटते की माणूस हा मुळातच एक स्वार्थी प्राणी आहे. इतर प्राण्यात तो स्वार्थीपणा दिसत नाही कारण ते निसर्गाच्या अधीन आहेत. पण माणूस हा असा प्राणी आहे ज्याने नेहमीच निसर्गावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न लाखो वर्षापूर्वीही केला आहे आणि आजही करत आहे. त्याची आज अनेक उदाहरणे समाजात दिसत आहेत.
त्यातील सर्वात मोठी कुरघोडी म्हणजे लिंगबदल शस्त्रक्रिया… त्याचे समर्थन करताना काही महाभाग महाभारतातील श्रीखंडीचे उदाहरण देतात. पण त्यांना हे कळत नाही. श्रींखडीनी स्त्रीची पुरुष तिच्यात पुरुषाच्या लैंगिक भावना होत्या म्हणून झाली नव्हती तर आपला बदला घेण्यासाठी झालेली होती.