Please Login to view Prime Content.
कबीर आणि risk

(Gold)
मुंगेरीलाल स्विमिंग शिकायला स्विमिंग पुलवर आला. खोल पाणी पाहून घाबरला.
पण कोचने धीर दिला, म्हणाला, ” मी तुला पोहायला शिकवेन. घाबरू नकोस. पाण्यात उडी मार!”
जीव मुठीत धरून मुंगेरीलालने पाण्यात उडी मारली आणि व्हायचे तेच झाले. मुंगेरीलालने पाण्यात गटांगळ्या खायला सुरुवात केली. नकातोंडात पाणी गेले. जोरात ठसका लागला. कोचने त्याला काठावर आणले.
मग मुंगेरीलालने एक प्रतिज्ञा केली,
” जोवर मला स्विमिंग येत नाही तोवर मी पाण्यात उतरणार नाही!!”
आज मुंगेरीलाल ८० वर्षांचा आहे. अजूनही त्याला स्विमिंग येत नाही.
आपली अवस्थाही अशीच होते. पाण्यात उतरायची हिंमत होत नाही आणि कोणत्याच लाटेवर स्वार होता येत नाही, कोणतही यश मिळत नाही.