आकाशवाणीच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे गीतरामायण. गेल्या पाच पिढ्यांपासून मराठी माणसांच्या मनावर अधिराज्य करणारे महाकाव्य म्हणजे गीतरामायण.. गीतरामायणाला यावर्षी ७० वर्षे पूर्ण झाली.
गीतरामायणाच्या जन्मापासून सत्तर वर्षांच्या प्रवासाचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले, गीतरामायणकार गदिमा यांचे सुपुत्र, श्री आनंद माडगूळकर यांनी या प्रवासाच्या अनमोल क्षणांना उजाळा दिला आहे, खास मराठीसृष्टी टॉक्सच्या प्रेक्षकांसाठी. त्यांच्याशी संवाद साधला आहे धनश्री प्रधान दामले यांनी. आपण तर पहाच…. इतरांनाही या आनंदात सामील करा…