विसरायला शिका

विसरायला शिका, मनाला जरा सावरायला शिका,
जगाच्या या गर्दीत स्वतःलाच जपायला शिका.

आज जे खांद्याला खांदा लावून साथ देत आहेत,
उद्या वळणावर तेही मागे राहून जातील.

स्वार्थाच्या या मेळ्यात नातीही बदलून जातात,
वेळ सरली की चेहरेही अनोळखी होऊन जातात.

म्हणून रुसवे, फुगवे, वेदना मनात नको साठवू,
जखमांवर हसत हसत आशेचा दिवा पेटवू.

कारण हे जग एका दिवसात सारेच विसरणार आहे,
तुमच्या अस्तित्वालाही सहजच मागे टाकणार आहे.

म्हणून स्वतःसाठी जगा, मनाशी मैत्री करा,
प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याची सवय करा.

विसरायला शिका... कारण हे जग,
एक दिवस तुमच्या बाबतीतही अगदी हेच करणार आहे.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212

विसरायला शिका… कारण हे जग,
एक दिवस तुमच्या बाबतीतही अगदी हेच करणार आहे.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212

Author