भक्तीच्या तेजस्वी संतकन्या

*संत मुक्ताबाई*
ज्ञानाची गंगा अंतरी वाहिली,
भावार्थाची ज्योत जगात पेटविली.
वैराग्य, विवेक, करुणेचा संग,
मुक्ताई ठरली भक्तीचा रंग.

*संत जनाबाई*
दासी म्हणवली जगाच्या दारी,
पण विठ्ठल होता तिच्या अंतरी.
जात्यावर दळता अभंग फुलले,
श्रमातही विठ्ठल तिला भेटले.

*संत कान्होपात्रा*
रूपापेक्षा भक्ती श्रेष्ठ मानली,
विठ्ठलच जीवनसाथी म्हणून जाणली.
मोह, माया सारे दूर सारले,
पांडुरंगाच्या चरणी जीवन अर्पिले.

*संत सोयराबाई*
समतेचा दीप अखंड पेटविला,
भेदभावाचा अंधार दूर केला.
चोखोबांच्या संगतीत भक्ती खुलली,
विठ्ठलनामाने आत्मा उजळली.

*संत निर्मळाबाई*
निर्मळ मन, निर्मळ आचार,
विठ्ठलभक्ती हाच जीवनाधार.
प्रेम, दया, समतेचा श्वास,
अभंगांतून दिला भक्तीचा सुवास.

*संत बहिणाबाई*
संसारातही साधना जपली,
तुकारामांची भक्ती हृदयी रुजवली.
कर्तव्य, श्रद्धा, प्रेमाचा मेळ,
बहिणाबाईंचा जीवनदिवा अविरत तेवला.

या संतकन्या नव्हत्या केवळ इतिहासातील नावं,
त्या होत्या भक्तीच्या नभातील अमर चांदण्या.

कोणी ज्ञानज्योती अंतरी चेतविली,
कोणी श्रमात विठ्ठलमूर्ती भेटविली.
कोणी समतेचा अखंड दीप उजळला,
कोणी प्रेमाने माणुसकीचा गंध दरवळला.

त्यांच्या अश्रूंनी अभंगांना सूर मिळाले,
त्यांच्या त्यागाने जीवनाला अर्थ लाभले.
त्यांच्या ओठी अखंड नामाचा गजर,
आणि हृदयी विठ्ठलाचा प्रेमसागर.

आजही त्यांच्या पाऊलखुणा
वारीच्या वाटेवर फुलांसारख्या दरवळतात.
प्रत्येक टाळ-मृदंगाच्या नादात,
प्रत्येक "विठ्ठल... विठ्ठल..."च्या गजरात
त्या आजही जिवंत भासतात.

या संतकन्यांना त्रिवार वंदन...
ज्यांनी स्वतःचं आयुष्य विठ्ठलाच्या चरणी अर्पून,
साऱ्या जगाला प्रेम, समता, ज्ञान आणि भक्तीचा अमृतवारसा दिला.

जोवर चंद्रभागेचं पावन पाणी अखंड वाहत राहील,
जोवर वारकऱ्यांच्या ओठी हरिनाम निनादत राहील,
जोवर टाळ-मृदंगाच्या तालावर वारी चालत राहील,
तोवर या संतकन्यांचं तेज
प्रत्येक भक्ताच्या हृदयात, प्रत्येक अभंगाच्या स्वरात
आणि प्रत्येक "विठ्ठल... विठ्ठल..."च्या गजरात
अखंड दीपज्योतीसारखं तेवत राहील...

या संतकन्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम...

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212



*संत मुक्ताबाई*
ज्ञानाची गंगा अंतरी वाहिली,
भावार्थाची ज्योत जगात पेटविली.
वैराग्य, विवेक, करुणेचा संग,
मुक्ताई ठरली भक्तीचा रंग.

*संत जनाबाई*
दासी म्हणवली जगाच्या दारी,
पण विठ्ठल होता तिच्या अंतरी.
जात्यावर दळता अभंग फुलले,
श्रमातही विठ्ठल तिला भेटले.

*संत कान्होपात्रा*
रूपापेक्षा भक्ती श्रेष्ठ मानली,
विठ्ठलच जीवनसाथी म्हणून जाणली.
मोह, माया सारे दूर सारले,
पांडुरंगाच्या चरणी जीवन अर्पिले.

*संत सोयराबाई*
समतेचा दीप अखंड पेटविला,
भेदभावाचा अंधार दूर केला.
चोखोबांच्या संगतीत भक्ती खुलली,
विठ्ठलनामाने आत्मा उजळली.

*संत निर्मळाबाई*
निर्मळ मन, निर्मळ आचार,
विठ्ठलभक्ती हाच जीवनाधार.
प्रेम, दया, समतेचा श्वास,
अभंगांतून दिला भक्तीचा सुवास.

*संत बहिणाबाई*
संसारातही साधना जपली,
तुकारामांची भक्ती हृदयी रुजवली.
कर्तव्य, श्रद्धा, प्रेमाचा मेळ,
बहिणाबाईंचा जीवनदिवा अविरत तेवला.

या संतकन्या नव्हत्या केवळ इतिहासातील नावं,
त्या होत्या भक्तीच्या नभातील अमर चांदण्या.

कोणी ज्ञानज्योती अंतरी चेतविली,
कोणी श्रमात विठ्ठलमूर्ती भेटविली.
कोणी समतेचा अखंड दीप उजळला,
कोणी प्रेमाने माणुसकीचा गंध दरवळला.

त्यांच्या अश्रूंनी अभंगांना सूर मिळाले,
त्यांच्या त्यागाने जीवनाला अर्थ लाभले.
त्यांच्या ओठी अखंड नामाचा गजर,
आणि हृदयी विठ्ठलाचा प्रेमसागर.

आजही त्यांच्या पाऊलखुणा
वारीच्या वाटेवर फुलांसारख्या दरवळतात.
प्रत्येक टाळ-मृदंगाच्या नादात,
प्रत्येक “विठ्ठल… विठ्ठल…”च्या गजरात
त्या आजही जिवंत भासतात.

या संतकन्यांना त्रिवार वंदन…
ज्यांनी स्वतःचं आयुष्य विठ्ठलाच्या चरणी अर्पून,
साऱ्या जगाला प्रेम, समता, ज्ञान आणि भक्तीचा अमृतवारसा दिला.

जोवर चंद्रभागेचं पावन पाणी अखंड वाहत राहील,
जोवर वारकऱ्यांच्या ओठी हरिनाम निनादत राहील,
जोवर टाळ-मृदंगाच्या तालावर वारी चालत राहील,
तोवर या संतकन्यांचं तेज
प्रत्येक भक्ताच्या हृदयात, प्रत्येक अभंगाच्या स्वरात
आणि प्रत्येक “विठ्ठल… विठ्ठल…”च्या गजरात
अखंड दीपज्योतीसारखं तेवत राहील…

या संतकन्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम…

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212

Author