कालचा व्हॅलेंटाईन डे…

कालचा व्हॅलेंटाईन डे.. तसा कोरडाच गेला…



कालचा व्हॅलेंटाईन डे…

कालचा व्हॅलेंटाईन डे
तसा कोरडाच गेला…
कोरडा वेगळ्या अर्थाने…
म्हणजे मालिका सोडल्या
तर व्हॅलेंटाईन डेचे
फारसे कौतुक कोठे दिसले नाही.

तसेही प्रेम व्यक्त करायला
आता खास दिवसाची
गरज तशी उरलेली नाही…

तरीही प्रेमाच्या नावाखाली
आमच्यासारखेच कोणी ना कोणी
शेण खात असते…

आम्हाला काही कधी
व्हॅलेंटाईन पावला नाही!
आता पावला तरी काही
उपयोगाचा नाही!

प्रेमकविता लिहिण्यापासून
प्रेम वगैरे असे काही नसतेच,
इथपर्यंतचा आमचा प्रवास
पूर्ण झालेला आहे.

प्रेमात शेण खाणे वेगळे आणि
आत्महत्या करणे वेगळे.

आमच्या वेळेला शिक्षकाने
एखाद्या विद्यार्थीनीला प्रपोज करणे
सामान्य होते. कारण…
तेव्हा मुली… घोड्या असायच्या…
घोड्या वेगळ्या अर्थाने…

पण हल्ली एखाद्या शिक्षकाने
एखाद्या विद्यार्थीनीला व्हॅलेंटाईन डेच्या
निमित्ताने प्रपोज करणे
ही आत्महत्या आहे…

कवी – निलेश बामणे (एन.डी.)
16/02/2026

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →