बलात्कार

बलात्कारावर कविता लिहावी अशी इच्छा नसते… पण…



बलात्कारावर कविता लिहावी
अशी इच्छा नसते… पण…

रोज येणारी एक नवीन बलात्काराची बातमी
कित्येक विचारी पुरुषांचा मेंदू सुन्न करणारी असते…

आतापर्यंत फक्त स्त्रियांवर बलात्कार होत होता,
पण हल्ली स्त्री-लिंगावरही बलात्कार होऊ लागला आहे.

माणसाच्या या जगात आता स्त्री-लिंगही सुरक्षित नाही.

आता एका वासनांध पुरुषाच्या बलात्काराची
शिकार एक कुत्रीही ठरली आहे.

ज्या पेशात आता बलात्कारी पुरुष नाही,
असा पेशाच आज शिल्लक राहिलेला नाही.

शिक्षकापासून पुजाऱ्यापर्यंत, प्रत्येक पेशात आज
बलात्कारी लपलेला आहे—बेमालूमपणे…

एकीकडे आकाशाला गवसणी घालणारी स्त्री
आणि दुसरीकडे रोज बलात्काराची शिकार ठरणारी स्त्री

पाहिली की प्रथम लाज वाटते ती स्वतःला पुरुष
म्हणून घेण्याची.

कारण प्रत्येक बलात्कारी आमच्यातीलच एक
पुरुष असतो…

©कवी – निलेश बामणे ( एन.डी.)
05/02/2026

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →