आई…
आज तुझ्या समोर उभा आहे मी,
बालपण मागे ठेवून.
तुझ्या कुशीत वाढलेलं लेकरू,
आज गुरुमार्गी निघाले.
तुझ्या अंगाईच्या सुरांनी
माझं बालपण फुलवलंस.
रात्रीच्या जागवणीतून तू
माझं भवितव्य जपलंस.
तुझ्या ओंजळीतील घासामध्ये
मायेचा गोडवा होता.
तुझ्या डोळ्यांतल्या स्वप्नामध्ये
माझाच उद्या दडला होता.
आज हा शेवटचा घास तुझा,
बालपणीचा शेवटचा क्षण.
उद्या जाईन गुरुकुली मी,
धरीन ज्ञानाचा व्रतधन.
माते, तुझ्या चरणी ठेवितो
माझा हा लहानसा प्रणाम.
तुझ्या कष्टांचा होईन मी
एक दिवस योग्य परिणाम.
तुझ्या डोळ्यांत पाणी नको,
हसू दे ओठांवरती.
तुझ्या आशीर्वादाच्या छायेखाली
चालेन मी जीवनभरती.
आई, तुझ्या ऋणातून सुटणे,
नाही शक्य या जन्मी.
पण तुझं नाव उजळवीन मी,
हीच प्रतिज्ञा करितो प्रत्येकजन्मी.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे