आधी सारखं काहीच राहिलं नाही

आपल्यात आधी सारखं काहीच राहिल नाही,
फक्त वेळ नाही बदलली, आपणच लांब गेलो.
स्पर्शात उब होती, आता तोही ओळखीचा वाटत नाही,
एकाच छताखाली असूनही मन निर्वासित झालं.

शब्द बोलले गेले, पण मन कधी उघडलंच नाही,
गप्प राहणं सोपं झालं, समजून घेणं कठीण.
दुखावलेलो नाही म्हणत राहिलो स्वतःलाच,
आणि नकळत स्वतःपासूनच दूर गेलो.

कधीकाळी “आपण” होतं जे, ते हळूहळू “मी” झालं,
तुझं माझ्याशी असणं, फक्त सवयीपुरतं उरलं.
आठवणी जिवंत आहेत, पण नातं श्वास घेत नाही,
कारण...
आपल्यात आधी सारखं काहीच राहिला नाही.

तरीही रात्रीच्या शांततेत एक प्रश्न टोचतो,
जर सगळं संपलंय, तर इतकी वेदना का उरते?

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे

कारण…
आपल्यात आधी सारखं काहीच राहिला नाही.

तरीही रात्रीच्या शांततेत एक प्रश्न टोचतो,
जर सगळं संपलंय, तर इतकी वेदना का उरते?

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे

Author