महादेव म्हणा, शंकर म्हणा

महादेव म्हणा, शंकर म्हणा, भोलेनाथ म्हणा ।
नाम घेताच अंतरी, शांती दीप जाणा ॥

भस्म विभूती अंगावरी, गळा रुद्राक्ष माळ ।
त्रिनेत्रीचा करुणेचा, अखंड वाहे जाळ ॥

कैलासपति योगिराज, भक्तांचा तो सखा ।
दुःख दारिद्र्य हरितो, ठेवितो जीवन रेखा ॥

महादेव म्हणा, शंकर म्हणा, भोलेनाथ नाम ।
नामस्मरणी जीव होई, शिवमय संपूर्ण धाम ॥

🙏 *हर हर महादेव* 🙏

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे

Author