पुन्हा मिळणार नाहीत, हे उमगूनही गमावले,
हातात हात असताना नशीबच हरवले.
हसत-हसत दूर गेली, काहीच न बोलता,
डोळ्यांत तीची स्वप्नं होती, ती अश्रूंनीच भिजवली.
आजही वाट पाहते, तीच जुनी पायवाट,
तू परत येशील म्हणून ऋतूंनाही थांबवले.
जे शब्द ओठांवर होते, ते ओठांवरच राहिले,
मूक वेदनांनी मग हृदयभर घर केले.
पुन्हा न मिळणाऱ्यांची किंमत उशिरा कळली,
विरहाच्या सावलीत
मात्र स्वतःलाच हरवले.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
Author
Post Views: 6