तुझ्या मिठीतून बाजूला होता ना,
माझे काही श्वास तुझ्या मानेवर राहिले.
क्षणभर थांबली होती ती शांत हवा,
आपल्या दोघांतले शब्द ओठांवर राहिले.
डोळ्यांत साचून राहिलं न बोललेलं काही,
आणि अर्थ सगळे त्या नजरेतून वाहिले.
रात्रीने विचारलं, “आठवण कुणाची?”
मी हसलो… तुझेच नाव ताऱ्यांवर राहिले.
वेळ पुढे गेला, अंतरही वाढलं,
तरीही तुझे स्पर्श हृदयात राहिले.
आजही एकांतात जेव्हा स्वतःला शोधतो,
तुझ्या अस्तित्वाचे ठसे माझ्यातचं राहिले.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
Author
Post Views: 8