तुझ्यातल्या तुला जप

तुझ्यातल्या तुला जप,
लोकांच्या मनाला नाही.
माझा देह सगळ्यांना दिसतो,
पण माझं असणं मात्र, अजूनही अदृश्यच आहे.

मी देहात राहते म्हणून मोजली जाते,
आत्मा आहे म्हणून विसरली जाते.
माझ्या श्वासालाही चौकटी आहेत,
माझ्या इच्छांना नावं दिली जातात.

माझ्या गर्भात जन्म घेतो काळ,
पण निर्णय माझे नसतात.
मी सृष्टीला आकार देते,
तरी मला ‘पूरक’ म्हणूनच ओळखतात.

मी प्रश्न विचारते तेव्हा बंडखोर,
मी गप्प राहते तेव्हा सहनशील.
माझं अस्तित्व नेमकं कुठे आहे,
या दोन टोकांच्या मधे मी झिजते रोज.

आज मी स्वतःलाच हळूच सांगते,
तुझ्यातल्या तुला जप.
देह संपेल, नावं बदलतील,
पण तुझं असणं… तेच तुझं अंतिम सत्य आहे.

* कीर्तिराज आगलावे



तुझ्यातल्या तुला जप,
लोकांच्या मनाला नाही.
माझा देह सगळ्यांना दिसतो,
पण माझं असणं मात्र, अजूनही अदृश्यच आहे.

मी देहात राहते म्हणून मोजली जाते,
आत्मा आहे म्हणून विसरली जाते.
माझ्या श्वासालाही चौकटी आहेत,
माझ्या इच्छांना नावं दिली जातात.

माझ्या गर्भात जन्म घेतो काळ,
पण निर्णय माझे नसतात.
मी सृष्टीला आकार देते,
तरी मला ‘पूरक’ म्हणूनच ओळखतात.

मी प्रश्न विचारते तेव्हा बंडखोर,
मी गप्प राहते तेव्हा सहनशील.
माझं अस्तित्व नेमकं कुठे आहे,
या दोन टोकांच्या मधे मी झिजते रोज.

आज मी स्वतःलाच हळूच सांगते,
तुझ्यातल्या तुला जप.
देह संपेल, नावं बदलतील,
पण तुझं असणं… तेच तुझं अंतिम सत्य आहे.

* कीर्तिराज आगलावे

Author