प्रत्येकालाच कोटा येथे जाऊन शिकायचं आहे कारण पुढे आयुष्यात नोटा मिळवायचे आहेत. शिक्षण क्षेत्रातदेश-विदेशात आपली वेगळी ओळख बनवणार कोटा. गेल्या३० वर्षापासून माहेश्वरी क्लासेस नी स्वतःची ओळख बनवली आहे. इयत्ता आठवी पासून ते विद्यापीठीय शिक्षणापर्यंत व्यवसायिक पद्धतीने यशाची खात्री देणारं ठिकाण म्हणजे कोटा. दरवर्षी दोन लाख विद्यार्थी येथे प्रवेश घेतात.
Education is a lifelong process हे विसरू न आपण पॅटर्नला महत्त्व देत आहोत There is no shortcut to success खोटं ठरवण्याच्या पद्धती विकसित होत आहेत. अपेक्षित, गाईड कोचिंग कोटा यामुळे साचेबद्ध अभ्यास कर यशोशिखर गाठण्याचा प्रयत्न केला जात आहे. आभासीयशोशिखरावरून जर आत्महत्या करून विद्यार्थी आपला जीवन संपवतअसतील तर त्या यशस्वी यशोशिखराकडे जायचं कशाला?संस्कार करणारे प्रसंगच कुटुंबात खंडित झाले आहेत. आजचा विद्यार्थी ज्ञानासाठी शिक्षण घेत नाही तर स्पर्धेसाठी शिक्षण घेत आहे त्याची परिमिती स्वतःच्या अस्तित्व विसरून मृत्यूला ते जवळ करत आहे. नातीगोती दुभंग पावली की माणूस ही दुभंगा ला वेळ लागत नाही
