आभाळातला जिराफ

(बुशमन लोकांमधील एक पुरातन दंतकथा)

आदिवासींचं म्हणणं आहे, काळ जेव्हापासून चालू झाला तेव्हा सूर्याला आपली आभाळातली वाट नीट माहीत नव्हती. प्रत्येक गोष्टीकडे कुतूहलानं टक लावून बघणं ही सवय जिराफाला होती. सृष्टीनिर्मात्याला वाटलं की सूर्याकडे लक्ष देण्याची कामगिरी जिराफावर सोपवावी.



(बुशमन लोकांमधील एक पुरातन दंतकथा)

आदिवासींचं म्हणणं आहे, काळ जेव्हापासून चालू झाला तेव्हा सूर्याला आपली आभाळातली वाट नीट माहीत नव्हती. प्रत्येक गोष्टीकडे कुतूहलानं टक लावून बघणं ही सवय जिराफाला होती. सृष्टीनिर्मात्याला वाटलं की सूर्याकडे लक्ष देण्याची कामगिरी जिराफावर सोपवावी. त्याची नजर राहिली म्हणजेच सूर्य चुकून भलतीकडे जाणार नाही. आपल्यावर सोपवलेली कामगिरी जिराफानं मनापासून बजावली. (त्यानं एवढी चोख नजर ठेवली की, सूर्य कधीही भलत्या दिशेला गेला नाही.) जिराफाच्या कामगिरीवर निर्माता खूष झाला. त्याचा सत्कार करावा असं निर्मात्याच्या मनात आलं. आभाळातल्या काही चांदण्यांच्या मूळच्या जागा बदलून त्यानं त्या अशा पद्धतीने मांडल्या की तो आकार जिराफाचा वाटावा.

आजही आभाळात तुम्हाला जिराफ दिसतो. आदिवासी ह्या चांदण्यांच्या आकाराला ‘टुटवा’ (जिराफ) म्हणतात. रात्री प्रवास करताना दिशा कळावी म्हणून ते ह्या आभाळातील खुणेचा उपयोग करतात. इंग्रजी बोलणारे लोक टुटवाला सदर्न क्रॉस’ म्हणून ओळखतात आणि तेही दिशा कळण्यासाठीच त्याचा उपयोग करतात.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →