पुण्याची मेट्रो जमिनीवरुन धावणार की भुयारातून जाणार …?

या विनोदी बातमीवर आधारित एक विडंबन …! उषःकाल होता होता वर आधारित असलेल्या या कवितेचा कवी माहित नाही, पण त्याला सलाम…



या विनोदी बातमीवर आधारित एक विडंबन …!

( उषःकाल होता होता वर आधारित )

या कवितेचा कवी माहित नाही, पण त्याला सलाम…

आकाशस्थ होता होता
भुमिगत झाली
अरे पुन्हा प्रवाशांनो
चालवा सायकली||धृ||

आम्ही आता मेट्रोचीही
आस का धरावी,
जे कधीच नव्हते
त्याची वाट का पहावी.
कशी पीएमटीने जनता
गुदमरुन गेली,
अरे पुन्हा प्रवाशांनो
चालवा सायकली.||धृ||

गल्लीबोळातुनी धावे आता
ही बीआरटी,
आम्हावरी अपघातांची
उडे धुळमाती;
आम्ही ते पुणेकर ज्यांना
एकही न वाली.
अरे पुन्हा प्रवाशांनो
चालवा सायकली. ||धृ||

उभे पुणे झाले आता
एक बंदिशाला,
इथे वारा पर्वतीचा
धुराने जळाला.
कसे पुणे दुर्दैवी अन्
नागपुर भाग्यशाली;
अरे पुन्हा प्रवाशांनो
चालवा सायकली. ||धृ||

धुमसतात अजुनी इथल्या
वडाफचे निखारे,
जादा भाडे मागत सुटती
रिक्षावाले सारे;
गाजरेच मेट्रोची ही
आम्हाला मिळाली.
अरे पुन्हा प्रवाशांनो
चालवा सायकली ..! ||धृ||

Author