आमचे खेळ

या मित्रांनो सारे या, सर्व मिळूनी खेळू या ।।धृ।।
खेळ आमच्या देशाचे गरिबांसाठी सोईचे ।
मैदान नको मोठे ते वस्तूही अल्प लागते ।।
खेळांना त्या समजून घ्या- १--- या मित्रांनो सारे या,

हुतुतूचा खेळ बघा दोन गट, छोटी जागा ।
स्पर्श रेषा ओलांडूनी ह्तुतू म्हणती तोंडानी ।।
एकाच दमात भिडू मारू या -२--- या मित्रांनो सारे या,

खो खो मध्ये चपळाई चकमा देण्याची घाई ।
उलट सुलट बसे एकाच रांगेत दिसे ।।
मिळता खो भिडूला पकडू या- ३--- या मित्रांनो सारे या,

लपंडाव हा खेळ कसा लपलेल्यांना शोधत बसा ।
राज्य येते त्यावरती शोध घेई सभोवती ।।
तीक्ष्ण नजर ती ठेऊया – ४--- या मित्रांनो सारे या,

आट्या पाट्या च्या खेळात कांही घरे आखतात ।
सीमेवरती दक्ष राहती घरात येण्या ते रोकती ।।

चपळाईने घरात शिरू या – ५--- या मित्रांनो सारे या,

एका पायाची गम्मत लंगडी आहे माहित? ।
उड्या मारीत पळावे भिडू सारे पकडावे ।।
आखल्या रेषेतच खेळू या- ६--- या मित्रांनो सारे या,

एक दिलाने खेळू या आनंद सारा लुटू या ।
निरोगी सदा राही तो प्रफुल्ल मन बाळगतो ।।
शीण अभ्यासाचा घालवू या – ७ --- मित्रांनो सारे या,

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com



या मित्रांनो सारे या, सर्व मिळूनी खेळू या ।।धृ।।
खेळ आमच्या देशाचे गरिबांसाठी सोईचे ।
मैदान नको मोठे ते वस्तूही अल्प लागते ।।
खेळांना त्या समजून घ्या– १— या मित्रांनो सारे या,

हुतुतूचा खेळ बघा दोन गट, छोटी जागा ।
स्पर्श रेषा ओलांडूनी ह्तुतू म्हणती तोंडानी ।।
एकाच दमात भिडू मारू या –२— या मित्रांनो सारे या,

खो खो मध्ये चपळाई चकमा देण्याची घाई ।
उलट सुलट बसे एकाच रांगेत दिसे ।।
मिळता खो भिडूला पकडू या– ३— या मित्रांनो सारे या,

लपंडाव हा खेळ कसा लपलेल्यांना शोधत बसा ।
राज्य येते त्यावरती शोध घेई सभोवती ।।
तीक्ष्ण नजर ती ठेऊया – ४— या मित्रांनो सारे या,

आट्या पाट्या च्या खेळात कांही घरे आखतात ।
सीमेवरती दक्ष राहती घरात येण्या ते रोकती ।।

चपळाईने घरात शिरू या – ५— या मित्रांनो सारे या,

एका पायाची गम्मत लंगडी आहे माहित? ।
उड्या मारीत पळावे भिडू सारे पकडावे ।।
आखल्या रेषेतच खेळू या- ६— या मित्रांनो सारे या,

एक दिलाने खेळू या आनंद सारा लुटू या ।
निरोगी सदा राही तो प्रफुल्ल मन बाळगतो ।।
शीण अभ्यासाचा घालवू या – ७ — मित्रांनो सारे या,

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →