कॉमनमॅनची गोची !

सध्या कांद्याने सरकारसकट सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे त्यात इतर गोष्टींचे दर गगनाला भिडले आहेत त्यात कॉमनमॅनचे कंबरडे मोडले आहे आणि त्यात सणासुदीच्या तोंडावर कॉमनमॅनचे हाल तर बघायलाच नकोत…!



|| हरी ॐ ||

स्वस्ताई आणि महागाई

जुळ्या दोन बहिणी

पाठीस पाठ लाउनी

जन्मास येती !

महागाई कॉमनमॅनच्या

पाचवीला पुजली,

स्वस्ताई तर

सगळ्यांना हवीहवीशी वाटली !

स्वस्ताई आणि महागाई

माणसे पैशामध्ये मोजती,

महागाईच्या मानाने

स्वस्ताईला किंमत लय भारी !

असतात सतत भांडत

एकमेकींची उणीदुणी काढत,

बहिणी बहिणींच्या भांडणात

कॉमनमॅन मात्र बसतो रडत !

सणासुदीच्या आधी

जाते महागाई व्यापारी आणि

साठेबाजांच्या स्वप्नी

घेते करवून आपल्या हिताच्या गोष्टी !

महागाई महा-घाईने सतत

डोके वर काढते,

स्वस्ताई सतत तिच्यावर

अंकुश ठेवत असते !

महागाई नेहमी आपले अस्तित्व

अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करीत असते,

पेट्रोल डिझेलच्या भावाने

सर्व जगाला सतत वेठीस धरत असते !

जगातील सर्वच अर्थतज्ञ आणि मंत्री

यांच्यापुढे नेहमीच गुडघे टेकतात,

गोंधळलेल्या आणि दबावाखाली

आकड्यांची निरर्थक जुळवा जुळाव करीत असतात !

सरकारने दोघींना मोकळे रान दिले,

व्यापार्यांनी महागाईला हाताशी धरून

आपल्याला हवेते पदरात पाडून घेतले !

सत्ताधारी आणि विरोधकात महागाईवरून

होत असतात सतत भांडणे,

त्यांना नसते सल महागाईच्या विळख्याची

त्यांना असते कड त्यापासून मिळण्याऱ्या फायद्याची !

स्वत:चे अस्तित्व टिकविण्याच्या नादात

कॉमनमॅनची मात्र होत असते गोची,

त्याला नसते माहित

कोणाची ही मखलाशी !

जगदीश पटवर्धन, बोरीवली (प)

— जगदीश पटवर्धन

Author