श्रीगुरुक्षेत्रम मंत्राचे करता पठण !

|| हरि ॐ ||

श्रीगुरुक्षेत्रम मंत्राचे गुरुक्षेत्री करता पठण

चंडिकाकुलाचे नी माझे झाले मिलन ||ध्रुव||

असेच श्रीगुरुक्षेत्रमी येता जाता

अनिरुद्धाच्या न माझ्या बोलल्या नजरा

तुझ्या माझ्यातील, माझ्या तुझ्यातील

प्रेमाचे स्मरते घट्ट भावबंधन

चंडिकाकुलाचे नी माझे झाले मिलन ||ध्रुव||

अनिरुद्धाशी अलगद बिलगता

कुरवाळता मज कुशीत घेता

वात्सल्याची होते जाणीव

नकळत पापण्या जाती पाणावून

चंडिकाकुलाचे नी माझे झाले मिलन ||ध्रुव||

मनात दाटल्या त्या भेटींच्या

लाल गुलाबी निळ्या जांभळ्या

भावविभोर त्या आठवणी

नकळत जाती उर भरोन

चंडिकाकुलाचे नी माझे झाले मिलन ||ध्रुव||

जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)

— जगदीश पटवर्धन

Author