तुझ्या डोळ्यांच्या पापण्या जशी लाजाळूची पानं मिटू मिटू पाहतात माझ्या नजर स्पर्शानं माझ्या नजर स्पर्शान.. तुझ्या डोळ्यांनी घेतलं माझ्या जिवाचं आंदण अंगभर पांघरलं जसं टिपूर चांदणं जसं टिपूर चांदणं. तुझ्या डोळ्यातली तीच माझी माझीच प्रतिमा सुखविते आदिमा अनिमिष बघण्यातून अनिमिष बघण्यातून.
— श्री.उदय विनायक भिडे
Author
Post Views: 11