मन तुझे कां गहिवरले ?

बागेतील तारका-



भाळी नसता कुंकंम तुझ्या गे
विरचक्र हे हातीं आले
मरणोत्तर हा किताब मळतां
मन तुझे कां गहिवरले ?

शुर विराची अर्धांगिनी तू
युद्धभूमिवर त्यास धाडीले
ओवाळूनी निरोप देतां
मन तुझे कां गहिवरले ?

देश सेवेत कामी यावे
ब्रिद त्याचे मनी ठसविले
सांगत असतां हेच दुजांना
मन तुझे कां गहिवरले ?

सुर्वणाक्षरीं वाचून गाथा
आदर्शमार्गी पडतील पाऊले
तव रक्ताचे नाते उसळतां
मन तुझे कां गहिवरले ?

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी *** ५
बोल सारे अनुभवांचे त्या बोलीची भाषाच न्यारी
सुख दुःखाच्या गुंत्यामधला अर्थ सांगतो कुणीतरी

— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर

Author