माझी स्वच्छता

BGHA MAZEE SWACcHTA KASHEE AAHE



बाई मला स्वच्छतेची भारी ग आवडरोज माझं घर मी तीनदा झाडते घरातला कचरा शेजारणीच्या दारात टाकते पण कटकट करायची तिला फार खोड ….१घरातल्या चादरी वारंवार धुतेग्यालारीतून खाली लोंबत सोडतेत्यामुळे शेजीबाईची म्हणे मोडतात झाडदामटत असते सदा ती आपलच घोडं…२आठवड्याला माझ घर मी नियमाने धुतेखराट्याने पाणी बाहेर लोटतेशेजारणीची रांगोळी मोडून जातेतेवढ्यावरन ती तोंड सोडतेखर सांगते ती मुलखाची आहे द्वाड….३स्वच्छता करून मी आजारी पडतेशेजीबाई माझी डबा घेउन येतेहसून म्हणते खाउन घे थोडमाझ्या स्वच्छतेची तिला नाही हो चाड…4बाई मला स्वच्छतेची भारी ग आवड

— प्रभा मुळे

Author