कृषीप्रधान आणि प्रजासत्ताक (लोकशाही) राष्ट्र

निवडक लोकांनी-स्वतःसाठी व काही निवडक लोकांसाठी चालविलेले राज्य आणि केलेली सोय लोकशाही होय!



भारत हे एक कृषीप्रधान आणि प्रजासत्ताक (लोकशाही) राष्ट्र आहे हे ज्ञान पुस्तकातून मिळाले. परंतु याची वास्तविकता काही औरच आहे हे काळाने आणि अनुभवाने शिकविले.
असामान्य-अदभूत लोकशाही…… “लोकांनी-लोकांसाठी चालविलेले राज्य लोकशाही होय” परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, “निवडक लोकांनी-स्वतःसाठी व काही निवडक लोकांसाठी चालविलेले राज्य आणि केलेली सोय लोकशाही होय!”
“शीरी फाटकच छत्र – अन्न वस्त्राचा अभाव,
जरी बळहीन तरी बळीराजा त्याचं नाव…..!”
कृषीप्रधानता किती वास्तविक आहे हे उघड डोळ्यांनी दिसते. या कृषीप्रधान व्यवस्थेचा पाया-कणा अर्थातच अस्सल शेतकरी सोडून बाकी सर्वांचेच हित होते हे या विशिष्ट व्यवस्थेचे वैशिष्ट्य आणि अस्सल शेतकरी वर्गाचे दुर्दैवच! पिकास भाव-कर्ज-वीज आणि अश्या अनेक समस्यांनी त्रस्त-वैतागलेला शेतकरी आत्महत्या करतो तरी ही कथित कृषीप्रधान व्यवस्था कागदावरच कार्यरत राहते…..!

— आय एस काझी

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →