नाच ग घुमा (२)







नाच ग घुमा

नाच ग घुमा

कशी मी नाचू

ह्या गावचा त्या गावचा

ऑर्केस्ट्रा नाही आला

रिदम नाही मला

कशी मी नाचू

ह्या कोपर्‍यावरचा

त्या कोपर्‍यावरचा

टेलर नाही खुला

नवा ड्रेस नाही मला

कशी मी नाचू

ह्या रोडचा त्या रोडचा

पार्लर नाही खुला

मेकप नाही मला

कशी मी नाचू

ह्या गावचा त्या गावचा

शूमार्ट नाही खुला

बूट नाहीत मला

कशी मी नाचू

— सौ. सुधा मोकाशी

Author