भोंडले (५)







सासरच्या वाटे गुलाब भेटे

कोण पाव्हणं आलंय ग बाई

सासरे पाव्हणं आलेत ग बाई

सासर्‍यांनी काय आणलंय ग बाई

सासर्‍यांनी आणली मिठाई

मिठाई मी खात नाही

सांगा मी येत नाही

दाराचं लॅच लावा ग बाई

गेटच्या वॉचमनला सांगा ग बाई ।।१।।

सासरच्या वाटे गुलाब भेटे

कोण पाव्हणं आलंय ग बाई

सासुबाई पाव्हण्या आल्यात ग बाई

सासुबाईंनी काय आणलंय ग बाई

सासुबाईंनी आणलीय पैठणी, पैठणी

साड्या मी नेसत नाही

सांगा मी येत नाही… दाराचं…. ।।२।।

सासरच्या वाटे गुलाब भेटे

कोण पाव्हणं आलंय ग बाई

नणंद पाहुणी आली ग बाई

नणंदेनं काय आणलंय ग बाई

नणंदेनं आणलंय रुचिरा ग बाई

स्वयंपाक मी करत नाही

सांगा मी येत नाही… दाराचं…. ।।३।।

सासरच्या वाटे गुलाब भेटे

कोण पाव्हणं आलंय ग बाई

हिरो पाहुणे आलेत ग बाई

त्यांनी काय आणलंय ग बाई

त्यांनी आणलेयं सुमो ग बाई

सुमोत मी बसते

सांगा मी निघते

पटकन् दार उघडा ग बाई

फ्रिजमधून कोल्डड्रिंक काढा ग बाई

— सौ. सुधा मोकाशी

Author