स्वदेशीच्या पेटवा मशाली

हातात ह्याच्या मिळताच सत्ता

सुरुवात केली मिळवायला मत्ता

धनोपहार हाच याचा शिरस्ता

चमच्यानां याच्या फुकटचा भत्ता



एकदा मज भेटला राजनेता त्यास पुसिले, ‘काम तुझा कोणता ?’कोणीतरी बोलले,परतला हा आता कुचकामी विदेशवारीसाठी गेला होता |१|जाऊनी तिकडे ह्याने केले काय ?कर्जासाठी रडला मोकलुनी धायदया कोणा आली काय ? जाचक अटीशिवाय पर्याय नाय |२| लपवीन्या आपले अपयश घातला याने बहुरूपी वेश विकसीत करीन म्हणे देश बघा ह्याचा लंगड़ा अभिनिवेश |३|स्वदेशिचा पडला मागे विचार परदेशी मालाला मागणीच फार डोक्याला ह्याच्या जडला आजारहा करू पाहतो आहे देश भिकार |४|हातात ह्याच्या मिळताच सत्ता सुरुवात केली मिळवायला मत्ता धनोपहार हाच याचा शिरस्ता चमच्यानां याच्या फुकटचा भत्ता |५|ओढा याला आता खुर्चीवरून खाली स्वदेशिच्या पेटवा प्रखर मशाली ….!* काव्य *नरेन्द्र श्रावणजी लोहबरे

— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश

Author
लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →