वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?

एकदा ना. सी. फडके प्र. के.अत्रेंना म्हणाले, “वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?”

अत्रे म्हणाले, ” योग्य वेळ आली की मी ते तुम्हाला सांगीन.”





एकदा ना. सी. फडके प्र. के.अत्रेंना म्हणाले, “वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?” अत्रे म्हणाले, ” योग्य वेळ आली की मी ते तुम्हाला सांगीन.”

त्यानंतर लवकरच फडकेंच्या पत्नीला अत्रे भेटले असताना अत्रे म्हणाले,”मी तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जाऊ या.”ही गोष्ट अर्थात लगेच फडकेंच्या कानावर आली, आणि त्यांनी अत्रेंकडे त्याबाबत खुलासा मागितला.

अत्रेंनी स्पष्टीकरण दिले ते असे:”अहो, मी म्हटले होते ‘मी, तुझा नवरा, तू, माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ या.’

— मराठीसृष्टी

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →