श्री गणेश स्तवन





ब्रह्मादिक वांदिली जयाला वेदांनी स्ताविलातो हा गणपती मी नमिला ।। धृ ।।दुर्वांकुर मस्तकी विलसतीशमीपत्रे त्या बहु आवडतीरक्तवर्ण कुसुमांच्या कंठी रुळली सुमनाला ।। १ ।।

सर्वांगावरी उठी शेंदुरीगंडस्थळी ते गंध केशरीपायी घागर्‍या पीतांबर तो कोससी कसला ।। २ ।।

नाग यज्ञोपोवीत मिरवलेशुभ्र वस्त्र तनुवरी शोभलेभक्तासाठी करी जयाने पाशांकुरा धरिला ।। ३ ।।

कार्यारंभी तया पूजितीविघ्नहारी हा मंगलमूर्तीशुभंकारक निर्विघ्न करुनिया सफल करी कार्याला ।। ४ ।।

ॐकारचीतो तया पासुनीअसे उपजले देव ते तिन्हीशब्दब्रह्म तो तयापासुनी अद्याक्षरमाला ।। ५ ।।

तो विघ्नेश्वर, बुद्धीसागर, कलागुणाधिपतीतो सुखकारक, वरदविनायक दया करो मजप्रतीकृपादृष्टी मग त्याची होता, काय उणे आम्हाला ।। ६ ।।

— किशोर करवडे

Author