जड झाला जीव आता
ओझं सोसवत नाही…
भोग भोगायचे किती आता
देवादारी बसवत नाही…!
जन्म वाया गेला राबण्यात
नाही गाव दुसरं पाहिलं..
भरल्या गोकूळ घराचं
सपान मनात राहिलं..!
वाट एकटा चालला
तिला जोडीला घेतलं..
एक नातं विश्वासाचं
त्याच्या जिवावर बेतलं…!!
…. राजेश जगताप, मुंबई
९८२१४३५१२९.
Author
Post Views: 16