जीवन

ऊन सावली जीवन हे रे
जसे मिळाले तसे जगावे
आनंदाची फुले होऊनी
दुःखाला सामोरे जावे ......... १

कुणास देणे नक्षत्रांचे
हात कुणाचे रिते राहिले
दैवाने हे हिशेब सगळे
त्या त्या खाती लिहिलेले ....... २

पान उद्याचे उद्या उलगडू
आज तयाचे कशास ओझे l
काल-आज जे लिहिले-पुसले
त्यात काय रे होते माझे?....... ३

......मी मानसी



ऊन सावली जीवन हे रे
जसे मिळाले तसे जगावे
आनंदाची फुले होऊनी
दुःखाला सामोरे जावे ……… १

कुणास देणे नक्षत्रांचे
हात कुणाचे रिते राहिले
दैवाने हे हिशेब सगळे
त्या त्या खाती लिहिलेले ……. २

पान उद्याचे उद्या उलगडू
आज तयाचे कशास ओझे l
काल-आज जे लिहिले-पुसले
त्यात काय रे होते माझे?……. ३

……मी मानसी

Author