ऑफिसातले माणिकमोती -२

तमाम पब्लिक धावतं
उगवत्या सूर्याला नमन करायला.
शेठच्या मुलानं बोलावतांच,
सिद्ध, कुल्ल्याला पाय लावून पळायला. -

तोंड घट्ट मिटून
किती गूढ गुपितं
आंत दडवून ठेवतं
ऑफिसचं भलंमोठं सेफ. -

प्रवास बोरीवली ते फोर्ट
डोंबिवली ते कोर्ट.
लोकलमधें डुलक्या-पत्ते-भजनं
ऑफिसमधें टिवल्याबावल्या करणं.

- सुभाष स. नाईक



तमाम पब्लिक धावतं
उगवत्या सूर्याला नमन करायला.
शेठच्या मुलानं बोलावतांच,
सिद्ध, कुल्ल्याला पाय लावून पळायला. –

तोंड घट्ट मिटून
किती गूढ गुपितं
आंत दडवून ठेवतं
ऑफिसचं भलंमोठं सेफ. –

प्रवास बोरीवली ते फोर्ट
डोंबिवली ते कोर्ट.
लोकलमधें डुलक्या-पत्ते-भजनं
ऑफिसमधें टिवल्याबावल्या करणं.

– सुभाष स. नाईक

Author