आपले प्रेम …

बऱ्याचदा वाटलं तुला सांगावं माझं तुझ्यावर प्रेम आहे ?
पण तुझे ? न सुटलेले कोडे आहे ?
तू जमीन तर मी आभाळ आहे...
आपल्या मिळण्यासाठी मी क्षितिजाच्या शोधात आहे ...
तसे एक क्षितिज आता सापडलेही आहे...
पण जितके त्याच्या जवळ जावे तितके ते दूर जाते आहे...
माझ्या हृदयाचे आभाळ चांदण्यांनी व्यापले आहे...
मनात एक चंद्र ही आहे...
या सगळ्यांना झाकणारा तुझाच प्रकाश आहे...
तुझे नि माझे मिलन झाले तर इतिहास घडणार आहे...
आणि नाही झाले तर मी इतिहास घडविणार आहे...
काहीही झाले तरी आपले प्रेम जिंकणारच आहे...

© कवी- निलेश बामणे



बऱ्याचदा वाटलं तुला सांगावं माझं तुझ्यावर प्रेम आहे ?
पण तुझे ? न सुटलेले कोडे आहे ?
तू जमीन तर मी आभाळ आहे…
आपल्या मिळण्यासाठी मी क्षितिजाच्या शोधात आहे …
तसे एक क्षितिज आता सापडलेही आहे…
पण जितके त्याच्या जवळ जावे तितके ते दूर जाते आहे…
माझ्या हृदयाचे आभाळ चांदण्यांनी व्यापले आहे…
मनात एक चंद्र ही आहे…
या सगळ्यांना झाकणारा तुझाच प्रकाश आहे…
तुझे नि माझे मिलन झाले तर इतिहास घडणार आहे…
आणि नाही झाले तर मी इतिहास घडविणार आहे…
काहीही झाले तरी आपले प्रेम जिंकणारच आहे…

© कवी- निलेश बामणे

Author