तुझ्याविणा (स्मृतिकाव्य)

जीवन हें वैराण
तुझ्याविणा ;
जीवन एक स्मशान
तुझ्याविणा.

निरर्थ आयुष्यच
तुझ्याविणा ;
अश्रूंचा खच फारच
तुझ्याविणा.

आयुष्यप्रवाह सुके
तुझ्याविणा ;
हें जग वाटे परकें
तुझ्याविणा.

मनिं दु:ख नित्य ताजें
तुझ्याविणा
श्वासांचेंही ओझें
तुझ्याविणा.

मी थकलो चालुन फार
तुझ्याविणा ;
साहवे न जीवनभार
तुझ्याविणा.

चालतां, रात्र आली
तुझ्याविणा ;
एकटा, पडे खाली
तुझ्याविणा.
- - -
(दिवंगत प्रियपत्नी डॉ. स्नेहलता हिच्या स्मृतीत)

- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com



जीवन हें वैराण
तुझ्याविणा ;
जीवन एक स्मशान
तुझ्याविणा.

निरर्थ आयुष्यच
तुझ्याविणा ;
अश्रूंचा खच फारच
तुझ्याविणा.

आयुष्यप्रवाह सुके
तुझ्याविणा ;
हें जग वाटे परकें
तुझ्याविणा.

मनिं दु:ख नित्य ताजें
तुझ्याविणा
श्वासांचेंही ओझें
तुझ्याविणा.

मी थकलो चालुन फार
तुझ्याविणा ;
साहवे न जीवनभार
तुझ्याविणा.

चालतां, रात्र आली
तुझ्याविणा ;
एकटा, पडे खाली
तुझ्याविणा.
– – –
(दिवंगत प्रियपत्नी डॉ. स्नेहलता हिच्या स्मृतीत)

– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

Author