श्री गणेश अवतारलीला
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिकविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेला श्री गणेश अवतारलीलांचा हा मराठी अनुवाद
August 23, 2025
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-धार्मिक-अध्यात्मिकविद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांच्या लेखणीतून साकारलेला श्री गणेश अवतारलीलांचा हा मराठी अनुवाद
August 23, 2025


Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिकजगातील सर्वात उंचावरून म्हणजे १६००० फूटांवरून धावणाऱ्या आगगाडीचा प्रवास’. तिबेट हा देश तसा भेट देण्यासाठी अवघड असल्याने खूपच वेगळे काहीतरी वाचल्याचा अनुभव येईल. नाझकाच्या अगम्य रेषा शाळेत शिकलेल्या भूगोलाची आठवण करून देतील. तर ‘इजिप्तमधले पिरॅमिडस व नाईलच प्रवास’, ‘उरोसची तरंगती बेटे’, ‘जपानचा साकुरा’, ‘स्वित्झर्लंडचे झरमॅट’, ‘दक्षिण आफ्रिकेतील ‘माबुला लॉज’ची वर्णने तिथे जाण्याची इच्छा मनात निर्माण करतील. दुबईसारख्या वाळवंटी प्रदेशातील बागा बघायला जाण्याचा नक्कीच मोह पाडतील व तिथे गेल्यावर ‘कशासाठी पोटासाठी’ मध्ये वर्णन केलेल्या कॉर्निशला भेट देण्याची आठवण नक्कीच येईल. ‘तांबोपाटा’ मधील व ‘वाईटामो केव्हज’ मधील वर्णन आपल्याला पुनःप्रत्ययाचा आनंद देईल. चिनी लोकांची मुखवटा बदलण्याची कला खूपच वेगळी वाटण्याजोगी आहे. हा प्रवास कसा सुरू झाला, त्यातली ‘अडथळ्यांची शर्यत’ कशी संपली याचे वर्णन वाचून प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रवासाची आठवण आल्याखेरीज राहाणार नाही. सिंगापूरला गेल्यावर पहिले काही दिवस कसे गेले, तिथे रुळायला काय काय करावे लागले हेही ‘सिंगापूरच्या आठवणी’ वाचल्यावर काहीजणांना त्यांच्या बदल्यांमुळे आलेले अनुभव आठवायला लावतील.
या पुस्तकातील लेख हे कोणत्याही देशाच्या स्थळाच्या वा प्रवासाच्या वेळेला अनुसरून लिहिलेले नाहीत. सगळे लेख वेगवेगळे आहेत. त्यामुळे मागचा कोणताही संदर्भ मनात न धरता कधीही कोणताही लेख काढला तर तो नवीन वाटला पाहिजे. आपल्याला तसा तो वाटावा ही अपेक्षा
August 23, 2025

Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिकश्रीदत्तगुरूंचे अखंड निवास स्थान असलेल्या गिरनार पर्वताचा भौगोलिक आढावा, जुनागढ संस्थान काळातील गिरनार, राजकीय संदर्भ, पुराणातील मान्यता, गिरनार पवर्तावरील मंदिरांची माहिती व त्याविषयीच्या कथा, दंतकथा, आध्यात्मिक संदर्भ अशी विस्तारीत माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर प्रथमच येत आहे.
ह्या पुस्तकाचे मूळ लेखक जुनागढचे स्थानिक इतिहासकार प्रो. डॉ. प्रद्युम्न भ. खाचर हे आहेत. याचे मराठी भाषांतर सौ. वैजयंती गिरीश गुप्ते आणि श्री. गिरीश म. गुप्ते यांनी केले आहे.
August 23, 2025


Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिकया पुस्तकातील प्रत्येक कथेत सतत मानवी मन डोकावताना दिसेल. कधी तिचे तर कधी त्याचे.
प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी तो किंवा ती येते किवा येत असते. तेव्हा मानवी मन काय आणि कसा विचार करते हे खरे तर शब्दात मांडता येत नाही, तेच मी प्रत्येक वेळी कमीतकमी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामधील कथा अनेकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून वाचल्या आहेत, त्यातील काही एकत्र या पुस्तकात देत आहे.
आणखी एक…. हे वाचल्यानंतर अनेकांचा…. म्हणजे स्त्री पुरुषाचा पहिला प्रश्न असतो तो, तुम्ही इतके आमच्या मनातले कसे ओळखता, तुमची अफेअर्स किती झाली आणि जी एफ किती.
मी काहीच उत्तर देत नाही ….
कशाला द्यायचे..
August 23, 2025


Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिकमी कोण आहे ‘ ह्याचा शोध घेताना माझ्यातला मी, माझ्याशी किती एकाग्र आहे हे पण बघणे आवश्यक आहे. एकाग्रता अत्यंत महत्वाची आहे.
तुमच्या मेंदू मधील कचरा जो तुम्हला सतत त्रास देत असतो तो डिलीट करता आला पाहिजे. पण तुम्ही हा कचरा साफ करताना आपण काय डिलीट करत आहोत याचेही भान हवे. कारण हे पण बघितले पाहिजे. आपण एखाद्या मानसिक आजारास निमंत्रण देत आहात का, ह्याबद्दलही विचार करणे आवश्यक आहे
August 23, 2025


Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिकव्यास क्रिएशन्सचा प्रतिभा दिवाळी अंक २०२२
August 23, 2025
Category:
साहित्य - ललितकंदाहार हा दक्षिण अफगाणिस्तानातला पहाडी प्रांत. या प्रांतातले पुरुष लढवय्ये आहेत आणि स्त्रिया सौंदर्यसंपन्न. कंदाहारी ‘पाश्तुन’ जमातीच्या अलिकडे झालेल्या डी. एन. ए. चाचण्यांवरून ते आर्यांचे वंशज असल्याचे आढळले आहे. आर्यांनी सुमारे 2300 वर्षापूर्वी या प्रदेशावर आक्रमण केले होते. तिथल्या पठाण कुटुंबात जन्मलेली एक मुलगी दिसायला खूप सुंदर होती. अकरा भावंडात पाचव्या नंबरची.
August 23, 2025
Category:
पॉडकास्टसिद्धहस्त चित्रकार शेखर साने दादा आपल्या पॉडकास्टवर पुन्हा आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत. त्यांना स्वामींनी कशी प्रेरणा दिली? स्वामी समर्थांमुळे त्यांचं आयुष्य कसं बदलून गेलं हे ते आपल्याला ह्या पॉडकास्ट मार्फत सांगत आहेत.
श्री स्वामी समर्थ!
August 23, 2025
Category:
पॉडकास्टसनातनी हिंदू धर्मात ज्या स्थानाला महत्व आहे ते म्हणजे काशी ज्याला आपण वाराणसी देखील म्हणतो. ह्या जगातील सर्वात जुनी नगरी म्हणून काशी चा उल्लेख केला जातो. ह्या स्थानचं महात्म्य काय आहे? कोणत्या गूढ गोष्टी ह्यात लपलेल्या आहेत? काशी विश्वनाथ, भैरव मंदिर, कामख्या मंदीर व इतर अनेक मंदिरांबद्दलची गूढ माहिती आपल्या ह्या पॉडकास्ट मधून मिळणार आहे व त्यासाठी आपल्यासोबत आहेत हर्षद सप्तर्षी.
1 Hour 41 Min
August 23, 2025


Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके - Englishशेरलॉक होम्स हे एक गाजलेले काल्पनिक पात्र. सर ऑर्थर कॉनन डोयल यांनी या पात्रावर आधारित अनेक रहस्यकथा लिहिल्या आणि त्या अजरामर झाल्या. या कथा इंग्रजीत आहेत.
आपल्या या लायब्ररीमध्ये ही मूळ इंग्रजी कथा तर आहेच, मात्र Machine Translations चा वापर करुन ती अनेक भारतीय भाषांमध्येही वाचण्याची सोय दिली आहे. अर्थात हे भाषांतर अचूक नाही. ते Arttficial Intelligence ने केलेले आहे. हा एक प्रयोग आहे. त्यात सातत्याने सुधारणा होत आहेत.
भविष्यात अशा प्रकारची पुस्तके येणार आहेत. मराठीसृष्टीचा हा initiative आपल्याला आवडला तर जरुर कळवा…
इतर भाषांतील पुस्तके मराठीत आणि मराठी पुस्तके इंग्रजीत वाचता येण्याची सोय हेच या खास इ-रिडरचे वैशिष्ट्य !
August 23, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti