जलतरंगवादक मिलिंद तुळाणकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteमिलिंद तुळाणकर हे सुमारे ३५ हून अधिक वर्षं जलतरंग वाजवत आहेत. जलतरंग हे प्राचीन भारतीय वाद्य असून ते वाजविणाऱ्या व्यक्ती दुर्मीळ आहेत. ‘ही ६४ कलांमधील एक कला आहे. या वाद्याला जलवाद्य किंवा ‘जलतंत्री वीणा’ असेही म्हणतात. यात कमीतकमी १२, तर जास्तीत जास्त २६ भांडी असतात.